शेतकरी संबंधी भाजपा युवा मोर्चाचे विविध मागण्यासाठी तहसीलदारांना निवेदन
कोरपना : सतत येणाऱ्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ पडला आहे.सर्वत्र पाऊस जास्त झाल्यामुळे शेतकऱ्यावर संकट ओढवले आहेत, शेतकरी राजाने दुबार-तिबार पेरणी करून हाती आलेले सोयाबीनचे पिक सुद्धा शेतकऱ्यांच्या हातून गेलेले असताना, सतत येणाऱ्या पावसामुळे कापसाची बोंडे सडून कापूस पिकावर बोंड अळी सुद्धा आलेली आहे,शेतकऱ्यांनी शेतीत लावलेला खर्चसुद्धा यावर्षी निघणार नाहीत,या निराशेने शेतकरी राजा हवालदिल झालेला आहे,त्यात शासनाने आणेवारी 50 पैसे पेक्षा कमी काढून,संपूर्ण चंद्रपूर जिल्हा नुकसान भरपाई मिळण्या करिता भारतीय जनता युवा मोर्चा कोरपना तालुकाच्या वतीने मा.तहसीलदार साहेब तहसील कार्यालय कोरपना यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
प्रमुख मागण्या
१) कापूस व सोयाबीन पिकाची नुकसान भरपाई हेक्टरी 25 हजार देण्यात यावी
२) पीक आणेवारी 50 पैशापेक्षा कमी दाखवण्यात यावी
३)ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा.
निवेदन देतेवेळी भाजपा युवा मोर्चाचे ओम पवार दिनेश सुर दिनेश खडसे, संदीप टोंगे, मनोज तुमराम ,कार्तिक गोनलावार आदी व युवा मोर्चा तालुका कोरपनाचे कार्यकर्ते उपस्थित होते.