सैय्यद ज़ाकिर हुसैन यांचे स्वतंत्र भारत के पहले शिक्षा मंत्री मौलाना अबुल कलाम आजाद या विषयावर यवतमाळ आकाशवाणी वर भव्य व्याख्यान!
यवतमाळ/समोर मलनस
भारत सरकार तर्फे स्वतंत्र भारतचे पहिले शिक्षण मंत्री आणि भारतरत्नाने सन्मानित राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मौलाना अबुल कलाम आझाद यांची आठवण म्हणून ११ नोव्हेंबरला शिक्षा दिवसचे रूपाने साजरा केला जात आहे ज्याची सुरुवात ११ नोव्हेंबर २००८ साली झाली स्वतंत्र भारतचे पहिले शिक्षण मंत्री आणि भारतरत्नाने सन्मानित मौलाना अबुल कलाम आझाद यांची १३२ वी जयंती निमित्ताने आर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते व युवा पत्रकार सैय्यद ज़ाकिर हुसैन यांचे दिनांक ११ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ९:३० वाजता ” स्वतंत्र भारत के पहले शिक्षा मंत्री : मौलाना अबुल कलाम आजाद ” या विषयावर आकाशवाणी यवतमाळ केंद्रावरून भव्य व्याख्यान चे प्रसारण होणार आहे,तरी आपण सर्व रसिक श्रोत्यांनी या प्रसारण जरूर ऐकावे असे आवाहन सैय्यद ज़ाकिर हुसैन यांनी केले.