पोस्टर स्पर्धेतून विद्यार्थीनींनी दिला दिवाळीसाठी सामाजिक संदेश
हिंगणघाट / अनंता वायसे : मातोश्री आशाताई कुणावार कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय हिंगणघाट व विद्या विकास कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट च्या संयुक्त विद्यमाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर “दिवाळीतील प्रदूषण” या विषयावर दिनांक १० नोव्हेंबर ला पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. उमेश तुळसकर, प्राचार्य, मातोश्री महिला महाविद्यालय हिंगणघाट, तर प्रमुख अतिथी व परीक्षक म्हणून डॉ नयना शिरभाते, उपप्राचार्य व विज्ञान विभाग प्रमुख, विद्या विकास महाविद्यालय, समुद्रपुर व प्रा. अजय बिरे यांची उपस्थिती होती, तर अतिथी म्हणून प्राचार्य नितेश रोडे प्रा. किरण वैद्य, प्रा. मंगला खुणे यांचीही उपस्थिती होती.
सदर पोस्टर स्पर्धेत एकूण ४० विद्यार्थीनींनी सहभाग घेतला, एकापेक्षा एक सरस संदेश विद्यार्थीनींनी पोस्टर मधून दिले. परीक्षक डॉ नयना शिरभाते यांनी विद्यार्थिनींच्या कल्पकतेचे कौतुक केले. प्रा अजय बीरे यांनी विद्यार्थिनींच्या दूरदृष्टी बद्दल त्यांचे अभिनंदन केले तर अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ उमेश तुळसकर यांनी विद्यार्थिनींची सामाजिक जाणीव व समर्पनाचे कौतुक करून समाजाला योग्य दिशा देण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करत राहावे असा आशावाद व्यक्त केला. स्पर्धेत अनुक्रमे पल्लवी गौळकर, अलीना बेग मिर्झा, नेहा कळसकर, साक्षी शिवणकर, श्रध्दा धोटे, अंकिता बलवीर यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अश्विनी चौधरी तर प्रास्ताविक प्रा सपना जयस्वाल व आभार प्रा विद्या झिलपे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कला वाणिज्य व विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.