जिल्ह्यात मागील 24 तासात 200 कोरोनामुक्त
केवळ 77 नव्याने पॉझिटिव्ह ; दोन बाधितांचा मृत्यू
■ आतापर्यंत 14216 बाधित झाले बरे
■ उपचार घेत असलेले बाधित 2554
■ एकूण बाधितांची संख्या 17024
चंद्रपूर, दि. 9 नोव्हेंबर : जिल्ह्यात गत 24 तासात 200 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 77 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील बगड खिडकी येथील 54 वर्षीय पुरुष व पठाणपुरा येथील 68 वर्षीय महिलेचा समावेश आहे.जिल्ह्यात आतापर्यंत 254 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 238, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली सात, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 77 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 17 हजार 24 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 200 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 14 हजार 216 झाली आहे. सध्या 2 हजार 554 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 26 हजार 633 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 8 हजार 210 नमुने निगेटीव्ह आले आहे.
तालुकानिहाय बाधितांची संख्या:
जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या 77 बाधितांमध्ये 43 पुरुष व 34 महिला आहेत. यात चंद्रपूर शहर व परीसरातील 38, पोंभुर्णा तालुक्यातील दोन, बल्लारपूर तालुक्यातील एक, मुल तालुक्यातील चार, गोंडपिपरी तालुक्यातील दोन, कोरपना तालुक्यातील एक, ब्रह्मपुरी तालुक्यातील पाच, नागभीड तालुक्यातील सात, वरोरा तालुक्यातील एक,भद्रावती तालुक्यातील दोन, सावली तालुक्यातील तीन, सिंदेवाही तालुक्यातील एक, राजुरा तालुक्यातील तीन, गडचिरोली पाच, यवतमाळ व तेलंगाणा येथील प्रत्येकी एक असे एकूण 77 बाधित पुढे आले आहे.
या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:
चंद्रपूर शहरातील व परिसरातील साईबाबा वार्ड, नगीना बाग, ओम नगर, पंचशील चौक, वडगाव, ऊर्जानगर, गाडगे बाबा चौक, नानाजी नगर, जल नगर वार्ड, कोसारा, सिस्टर कॉलनी परिसर, भिवापुर वॉर्ड, श्रीराम वार्ड, बाबुपेठ, विद्यानगर, घुटकाळा वार्ड, तुकूम, एकोरी वार्ड, सरकार नगर भागातून बाधित पुढे आले आहे.
ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:
बल्लारपूर तालुक्यातील राणी लक्ष्मी वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील रामनगर कॉलनी परिसर ,कोहपरा भागातून बाधित पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील बालाजी वार्ड, शिवाजीनगर, देलनवाडी परिसरातून बाधित ठरले आहे.
वरोरा तालुक्यातील राम मंदिर वार्ड भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील देऊळवाडा कोंढा, परिसरातून बाधित पुढे आले आहे.
सिंदेवाही तालुक्यातील गोविंदपुर भागातून बाधित पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव, चावडेश्वरी मंदिर परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. मुल तालुक्यातील वार्ड नंबर 14, वार्ड नंबर 10 परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील सुकवाही भागातून बाधित पुढे आले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.