ओबीसी जनगणनेच्या लढ्यात युवकांनी पुढाकार घेण्यांची गरज – अँड. अंजली साळवे

0
673

ओबीसी जनगणनेच्या लढ्यात युवकांनी पुढाकार घेण्यांची गरज – अँड. अंजली साळवे

किरण घाटे

राजूरा । 2021 मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय ओबीसी जात प्रवर्ग दर्शविणारा रकाना असावा. तरच ओबीसी समाज येत्या जनगणनेत सहभागी होईल. ओबीसी जनगणना व्हावी या अनुषंगाने 26 नाेव्हेंबर 2019 ला
“ओबीसी का एलान पाटी लगाओ” अभियान सुरू केले आहे. या साठी आपण न्यायालयीन लढा दिला आहे. ओबीसी चा लढा हा तीव्र करण्याची आता गरज आहे. यासाठी युवकांनी स्वता पुढाकार घ्यावा असे मत डॉ.ऍड. अंजली साळवे (विटनकर ) यांनी राजुरा येथे एका सभेत बाेलतांना व्यक्त केले.
तालुका ओबीसी समन्वय समितीच्या वतीने राजुरा येथील धनोजे कुणबी सभागृहात रविवारी ओबीसींच्या जनगणनेचा प्रश्न निकाली काढण्या साठी एक महत्वपुर्ण सभा पार पडली.
या प्रसंगी समाज बांधवांना मार्गदर्शन करतांना
डॉ.ऍड.अंजली साळवे (विटनकर) बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की ओबीसींच्या हक्काचा लढा एकत्रित येऊन लढणे गरजेचे आहे. ओबीसी समाजाचे राजकीय नेते, पक्ष कार्यकर्ते व ओबीसी समाजांनी आपसातले मतभेद व मनभेद बाजूला सारून ओबीसीच्या जनगणनेचा लढा निर्धाराने लढण्याची गरज आहे. भारतीय संविधान आपल्या बाजूने आहे. 340 कलम आपल्या साक्षीला आहे. सामान्य माणसाला याचे महत्व पटवून देणे आश्यक आहे. युवा पिढीने यात सहभाग घेऊन एकत्रित येऊन हा लढा तीव्र करण्याची नितांत गरज आहे. या वेळी ऍड. पुरुषोत्तम सातपुते कुंदाताई जेणेकर, संभाजी साळवे यांनी आपल्या मनोगतातून समाज बांधवांना मार्गदर्शन केले. विविध सामाजिक क्षेत्रातुन युवकानी ओबीसी साठी लढ़ा उभारण्याकरीता ओबीसी समन्वय समिति मध्ये नियुक्ति करण्यात आली.
यावेळी संतोष देरकर, साईनाथ परसुटकर, सुभाष अडवे, विवेक खुटेमाटे, चापले उमेश पारखी, केतन जुनघरे, ओबीसी समन्वय समिती राजुराचे अध्यक्ष उत्पल गोरे, महासचिव सूरज गव्हाणे, उपाध्यक्ष विशाल शेंडे, प्रदिप बोबडे, सुजित कावळे, स्वप्निल शेरकी, सूरज भामरे, रितिक बुटले, निलेश बोंसुले, प्रणव बोबडे, मनोज बोढेकर, कवडु नागोसे, प्रविण चौधरी, वैभव गालफड़े, प्रतिक कावळे, करण झाडे, प्रज्वल ढवस, यश मोरे, संकेत पारखी, अमोल ढोले, अतुल चोथले, अंकित पारखी, अमोल काकडे इत्यादी समन्वयक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केतन जुनघरे यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन गायत्री उरकुडे यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार प्रणव बोबडे यांनी मानले. सभेला युवक युवतींची उपस्थिती उल्लेखनिय हाेती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here