पांढ-या सोन्यावर गुलाबी बोंड अळीचे सावट! शेतकरी वर्ग परत एकदा संकटात !
तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन!
किरण घाटे
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील आजगाव, पाचगाव, खैरी, कवडशी, साठगाव ,कोलारी आंबोली, वाकर्ला आदि परिसरातील कापूस पीकावर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव सुरु झाला असून नुकतेच चिमूर तालुका क्रूषी अधिकारी ज्ञानदेव तिखे यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतांची पाहणी केली आहे. या बाबत त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुध्दा केले असल्याचे व्रूत्त नुकतेच प्राप्त झाले आहे.
कधी अस्मानी, तर कधी शासनाच्या चुकीच्या कृषी धोरणामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे संकट संपता संपेना! ह्या वर्षी हंगामाच्या आरंभीच शेतीवर कोरडा व त्यानंतर ओला दुष्काळाच्या सावटातुन शेतातील पीक सावरत असतांनाच या परिसरातील कापूस पीकावर गुलाबी बोंड अळीचे सावट पसरल्याचे द्रूष्टीक्षेपात प्रत्यक्षात पडत आहे. शंकरपूर भागातील पीकांवरची ही परिस्थिती बघताच कृषी मंडल अधिका-यांनी याची सविस्तर माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांना तातडीने दिली. शेतक-यांच्या शेतातील पीकाची परिस्थिती लक्षात घेता चिमूर तालुका क्रूषी अधिकारी ज्ञानदेव तिखे यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पीकांची पाहणी केली व शेतकऱ्यांना वेळीच याेग्य मार्गदर्शन केले. या शिवाय गावात सभा घेऊन यावर उपाय योजना बाबतची माहिती दिली. सदरहु शेतकरी मार्गदर्शन सभेला शंकरपूर च्या मंडळ कृषी अधिकारी संपदा इंगुळकर, कृषी सहाय्यक प्रताप रेंगे, कृषी पर्यवेक्षक संजय पाकमोडे, कृषीमित्र, बंडू पानसे , विष्णू राखडे व शेतकरी उपस्थित होते.