कोरोना जनजागृती काव्यधारा – १७
कवी – नितीन जुलमे, कोरपना
कविता : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’
कोरोना संकटकाळी
एक शक्ती दावू सारी
माझे निरोगी कुटुंब
माझीच जबाबदारी…
आळा घालूयाच आता
कायद्याच्या औषधाने
जाईल पळुनी बाधा
शुद्ध कर्तव्य कराने
साथ देऊ शासनाला
घालवूया महामारी…
मास्क सॅनिटायझर
जणू चिलखत वाटे
तया पाई भस्म होती
कोविड विखारी काटे
रणशिंग हे फुंकूया
या युद्धाचे दारोदारी…
योद्धे आमुचे पोलिस
नर्स डॉक्टर महान
स्वछताकर्मीना आशा
देऊया मानाचे आसन
प्रतिबंधाने जिंकूया
तारू मानव्य शिदोरी…
दिस हेही जातींन हो
येईल सुखाच्याच राती
कष्ट जिद्दीने लावूया
शांती करुणेच्या वाती
मानवतेच्या धर्माला
अवीट गोडी ती न्यारी…
कवी : नितिन जुलमे, कोरपना
संपर्क. ८८०६६८५८५७
(महाराष्ट्र शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेला सहाय्य म्हणून फिनिक्स साहित्य मंच द्वारा सदर विषयावर ऑनलाईन कविसंमेलन पार पडले. यात सहभागी कविंच्या कोव्हीड-१९ बाबत जनजागृतीपर कविता आम्ही आपणास देत आहोत.)