अशा घडल्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पाचवडच्या नामवंत सहज सुचल महिला व्यासपीठाच्या कवयित्री कु. अर्चना दिलीप सुतार !
किरण घाटे
आपण आपल्या उभ्या आयुष्यात कश्या प्रकारे घडत गेलाे हे पाचवड नावाच्या या छाेट्या गावांतील आंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रख्यात कवियित्रि कु.अर्चना सुतार यांनी एका लेख मालेत शब्दांकित केले आहे त्या लेखातील काही अंश खास वाचकांसाठी या ठिकाणी देत आहाे .विशेषता त्या महाराष्ट्रातील लोकप्रिय सहज सुचलच्या सदस्या आहे .
मी कवियत्री, शिक्षिका तसेच समाज सुधारिका कु. अर्चना दिलीप सुतार! माझा जन्म महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्या अंतर्गत येणा-या वाई तालुक्यात पाचवड या छोट्याशा गावी झाला. माझ्या घरची आर्थिक परिस्थिती तशी जेमतेमच ! आई गृहिणी तर वडील शेती व्यवसाय करतात. तसे दोघेही कष्ट करून जगतात. वडिलांचे शिक्षण अकरावी झालेले , जन्मदातीआई सातवी पर्यंत शिकली ! माझे चुलते हायस्कूल शिक्षक होते. तर चुलती गृहिणी आहे. बालपण चांगले गेले! पण चुलते शिक्षक असल्यामुळे त्यांची परिस्थिती चांगली व मजबूत होती. माझे चुलत भाऊ बहीण मजेत असायचे. आम्हाला पण आईवडिलांनी काही कमी केले नव्हते. घरात आम्ही एक भाऊ आणि आम्ही दोघी बहिणी होतो. आम्ही तिघेही वेल एज्युकेटेड आहोत. पण मी खूप जिद्दी व मेहनती होते. लहानपणापासून अभ्यासात लक्ष नेहमी केंद्रित असायचे. मला अभ्यासाची खूप आवड होती. कोणतेही काम मनापासून करणे हे जन्मताच अंगात रुजले होते. लहानपणी आई-वडिलांनी हाका मारत तोपर्यंत खेळले आहे. माझा स्वभाव खूप मायाळू ,प्रेमळ होता आणि आहे. कोणासाठी लगेच जीव तुटणे ,लगेच रडू येणे, भावना अनावर होणे. चुलते शिक्षक आहेत म्हटल्यावर मला पण शिक्षक व्हायची इच्छा असायची. !वडील,आई जरी शिक्षक नसले तरी त्यांना आमची शालेय पुस्तके वाचण्याची खूप आवड होती. ते ही आम्ही अभ्यास करत असताना उशीर पर्यंत पुस्तके वाचायचे.पण आमच्याकडे कटाक्षाने त्यांचे लक्ष असायचे. न चुकता पहाटे अभ्यासाला उठवायचे. ते म्हणायचे जिद्द हीच आपली संपत्ती असते. त्यांच्या डोळ्यांकडे बघितले तरी आम्ही घाबरायचं ! कारण शिक्षणात दुर्लक्ष केलेले त्यांना आवडत नसायचे. याच जिद्दीवर खूप मोठे होण्याची स्वप्ने मी लहानपणीच पाहिली. पण सगळी स्वप्ने पुर्ण होतातच असे नसते. माझे शिक्षण आमच्या गावच्या महात्मा गांधी हायस्कूल (पाचवड) येथे झाले. माध्यमिकला शिकत असताना कवितेचे बीजं अंगी रुजले. आठवीत असताना गावडे मॅडमनी देशावरती कविता करण्यास सांगितले होते.कविता म्हणजेच काही कळत नव्हते. पण देशाविषयी वाटणारे प्रेम मनातून उफाळून येत होते. म्हणूनच आयुष्यातली “देशप्रेम” नावाची पहिली कविता लिहिली. कवितेचे बोल होते “देशासाठी झटताना पर्वा करणार नाही देहाची, मग जरी मरण आले तर परवा मग कसली त्याची. या कवितेच्याच उक्तीप्रमाणेच आजवर मी जगत आले.खरंच समाजा बद्दलची तळमळ !समाज जग म्हणजे एक परिवारच !आणि माणुसकी हीच एक जात असे मला नेहमीच वाटून माझी परिस्थिती नसल्यामुळे पण जन्माला येऊन समाजासाठी काहीतरी करावे या मनोवृत्तीने निदान कवितेतून समाज जनजागृती करायला शिकले. ती कविता माध्यमिक वार्षिक पुस्तकात आली होती. बारावी नंतर मी पोलीस भरतीला उभी राहिले. आणि आमच्या समाजा करीता 13 जागा भरायच्या होत्या. माझा नंबर वेटिंगला पहिला लागला. मी भरती होऊनही भरती नव्हते. खूप निराश झाले. पण पुन्हा एम.पी.एस.सी. परीक्षेला PSI,ISI,STI या पदांसाठी बसले. पण त्यातही थोड्या गुणांसाठी अपयश आले. पण त्याच अभ्यासाचा उपयोग मलाBED CET देण्यासाठी झाला. मी BED CET परीक्षा यशस्वीपणे पास होऊन BED ला माझा नंबर लागला आणि माझा नंबर मॉडर्न कॉलेज ऑफ एज्युकेशन मलकापूर कराड येथे (बीएडला )लागला. बीएडला असतानाही पुन्हा कविता लिहिण्याची दुसऱ्यांदा संधी आली. मग मी त्यावेळेस इंग्रजीतही कविता लिहिली. कवितेचे नाव होते”Life is chain” माझ्या व्यतिरिक्त इंग्रजीत कविता करणार कॉलेजमध्ये कोणीच नव्हतं. माझा मराठी आणि इंग्रजी विषयातील दोन्हीहि कविता BED कॉलेजच्या पुस्तकात पाटील मॅडमनी छापून घेतल्या. तेव्हापासून कवितेची गोडी अजूनच वाढत गेली. पण BED चालू असल्यामुळे कविता लिहिण्यास वेळ नव्हता. 2012 साली बीएड पूर्ण झाले. पण सरकारी शिक्षक भरती चालू नसल्यामुळे हायस्कूल वर खाजगी नोकरी करत राहिले. मग मधल्या काळात घरी सर्व कामे उरकून अनेक विचार मनात घाेळायचे मग त्या विचारांचेच शिक्षणाचे विचार कविता रूपात उमटू लागले. मी आयुष्यावर छान छान कविता लिहू लागले. कारण काही नाही नशिबात निदान जे येतंय ते तरी केलं पाहिजे कारण वेळ व्यर्थ तर जीवन व्यर्थ ! वेळ नशिबाने जरूर घालवला असेल कोण चांगल्या चांगल्या चारित्र्यवान व्यक्तींचे समाजशील व्यक्तींचे पुस्तके वाचणे कविता वाचणे असा छंद जोपासल्याने थोरामोठ्यांचे विचार अंगी समृद्ध होत गेले. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणतात संकटे तुम्हाला हरवण्यासाठी येत नसून तुमच्यामध्ये असलेले सुप्त गुण बाहेर काढण्यासाठी येत असतात. म्हणून मी पण तेच शिकले संकटे आजपर्यंत जीवनात खूप आली. अभ्यासात लिहिल्याप्रमाणे आपल्याही जीवनात घडावे. आपणही मोठे व्हावे नेहमी वाटायचे.आपल्याही समाजात नाव असावं 82 वे साहित्य संमेलन,83 वे साहित्य संमेलन हे पुस्तकात वाचायचे आज मी पण 91 वे भारतीय साहित्य संमेलनात गुजरात येथे जाऊन कविता सादर करण्याचा मान मला मिळाला. कवितेतील उत्साह अजूनच वाढत गेला. मलाही वाटू लागले आपणही बहिणाबाई चौधरी, इंदिरा संत यासारखे कवियित्री म्हणून नावारूपास यावे. त्यांचे समाजात किती मोठे नाव आहे. आपणही त्यांच्यासारखे नावाने समाजात अजरामर व्हावे असे वाटू लागले. त्यासाठी अनेक कवी संमेलनांना उपस्थिती दर्शवली. कविता सादर केल्या. अनेक विषयावर कविता लिहिल्या. मला सातारा जिल्ह्याची पाचवड गावची कवियत्री म्हणून ओळखू लागले. अंगी जिद्द कवितेची आवड समाजासाठी काहीतरी केले पाहिजे या भावनेने 2019, 20 या काळात जगावर कोरोना नावाच्या महाभयंकर संकटाने घातल्याने मन बेचैन झाले. आणि अंतर्गत मन समाजासाठी कोरोनापासून बचावासाठी माणसांसाठी समाजासाठी आपणही काहीतरी केलेच पाहिजे आपणही काहीतरी केलेच पाहिजे या भावनेने मनात तरंग उठू लागले. आणि माझ्यातली धडाडीची कवयित्री जागी झाली. जग म्हणजे मला तर एक परिवारच वाटतो. कोरोणावर भारत सरकारवर कविता करून कविता लिहून सोशल मीडियावर बिंदास्तपणे जनजागृती आरंभ केली. चांगल्या कामाला कोणाची भीती कशाला माझ्या कोरोनावरील कविता पाहूनYOU TUB चैनेल वाल्यांनी माझ्या कविता हिरीरीने मागून त्यांच्या चॅनेल द्वारे प्रसिद्ध केल्या. यामध्ये विशेष करून टॉप न्यूज सातारा, आकाश प्रकाशन नांदेड, सि टी इंडिया, विसभा आणि महाराष्ट्र माझा इत्यादी चॅनेल्स होते. काही दिवसातच चंद्रपूर जिल्ह्यातील इम्पँक्ट -२४ या न्यूज चैनलने बातम्यांतुन मला प्रसिध्दीच्या शिखरावर पाेहचविले तदपुर्वि माझी म्हसवडच्या माणदेशी तरंग वाहिनीवर 17/ 6 2020 रोजी मुलाखत झाली. असे करत असताना मला महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमधील सामाजिक संस्थांनी जनजागृतीचे सामाजिक कार्य पाहून “कोविंड योद्धा” म्हणून गौरविण्यास सुरूवात केली. भारतातील बहुतेक सर्वच राज्यांनी”कोविंड योद्धा” म्हणून गौरविले. याचा परिणाम म्हणून अनेकांनी तर मला सामाजिक पुरस्कार दिले. भुसावळहून “कर्मवीर” पुरस्कार, पुणे प्रवाहने “कोविंड महायोद्धा” पुरस्कार, कंट्रोल क्राईमने “कोविड योद्धा” असेच इतर सर्व मिळून (125) कोविंड योद्धा पुरस्कार देऊन गौरविले. “प्रेरणादायी पुरस्कार”, “समाज भूषण पुरस्कार”, आंध्रप्रदेश राज्याने “ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार”, तमिळनाडू राज्याने”जंटल वुमन राष्ट्रीय पुरस्कार” आणि तदनंतर तर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मला मिळाले. त्यानंतर श्रीलंका देशाने “श्री जीवननंदा अॅप्रिसिएशन फोर नोबेल वर्क” हा एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि “इंटरनॅशनल महात्मा गांधी आयकॉन 2020 ॲवार्ड” हा दुसरा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मला प्रदान केले. आणि त्यानंतर तर (UN) म्हणजे संयुक्त संस्थाचा 193 देशांचा एकत्रित मिळून 24 ऑक्टोंबर 2020 रोजी 75 व्या वर्धापन दिनानिमित्त “United Nations 75 Anniversary Historical Memorias Award 2020”
हा सर्व देशांच्या वतीने मलेशिया देशाने राष्ट्रीय पुरस्कार मला प्रदान केला. आणि सर्वांच श्रेय म्हणूनच (WHO) म्हणजे World Health Organization ( जागतिक आरोग्य संघटना) ज्याचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेनेही मलेशिया देशाहून “जागतिक काेविड योद्धा” म्हणून घोषित केले. आणि एवढ्या सर्वांचा सार म्हणून त्या उत्साहावर मी कोरोना विषयावर 100 पेक्षा जास्त कविता लिहिल्या या कवितांची नोंद Exclusive World Record मध्ये पण झाली. अशाप्रकारे माझ्या सामाजिक कार्याला यश येऊन मोठी आंतरराष्ट्रीय पातळीवरची कवियित्री होण्याचे भाग्य माझ्या पदरी पडले. त्यामुळे जीवन सार्थक झाल्याचे वाटते. यातून एक संदेश द्यावासा वाटतो. जीवनात शिक्षणाला फार महत्त्व आहे. आणि कितीही संकटे आली तरी खचून न जाता संकटे तुम्हाला बाहेर काढण्यासाठी तुझी परीक्षा घेत आहेत. आणि या आयुष्याच्या परीक्षेत जिद्द, चिकाटी अंगी असेल तर या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. आणि स्वप्ने ही खुजी नसावीत मोठी असावीत कारण ती जरी पूर्ण झाली नाही तरी कारण रडत न बसता कोणत्या दिशेने आपण वाटचाल तरी करतो.
कु. अर्चना दिलीप सुतार (पाचवड) जिल्हा सातारा.