सेवानिवृत्त बिएसएफ जवानाचे आँल इँडिया एक्स बिएसएफच्या वतीने वर्धेत भव्य स्वागत!

0
653

सेवानिवृत्त बिएसएफ जवानाचे आँल इँडिया एक्स बिएसएफच्या वतीने वर्धेत भव्य स्वागत!

मित्र मंडळी व चाहत्यांची उपस्थिती!

किरण घाटे

वर्धा । विदर्भातील वर्धा येथील बीएसएफ जवान गणेश वायकोस हे 21 वर्ष देश सेवा करून नुकतेच सेवानिवृत्त होऊन ते आपल्या घरी परतले .त्यांचे आगमना निमित्ताने वायकाेस यांचे मोठ्या थाटात , जल्लोषात , व ढोल ताशाच्या निनादात सन्मानपुर्वक स्वागत करण्यात आले .तसेच त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना खुल्या जीपमध्ये बसवून मित्र परिवारांकडुन या वेळी बाँईक रैली काढण्यात आली . समाजामध्ये चांगला संदेश देत एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न वर्धा आँल इंडिया एक्स बिएसएफने केला आहे.

बाँईक रैली दरम्यान ते पूर्वी राहत असलेल्या वर्धा येथील मालगुजारी पुरा येथील नागरिकांनी त्यांना पुष्पगुच्छ देवून व औक्षवंत करून त्यांचे स्वागत केले . शिवाजी चौकात जनक्रांती सेनेच जिल्हाध्यक्ष सुशांत खडसे यांनी तर आर्वी नाका चौकात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे तथा प्रा.चेतन ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले.माजी सैनिक गणेश वायकोस यांच्या साटोडा गावी ग्राम पंचायत सदस्य अजय दानवे यांनी देखिल त्यांचे स्वागत केले.

रॅली कार्यक्रमाचा समारोप त्यांच्या निवासस्थानी एका छोट्या खानी भाषणांनी झाला. या कार्यक्रमालाऑल इंडिया एक्स बीएसएफ चे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत शेगावकर व सुधीर सहारे हे अमरावतीहून आले होते.स्पाेर्ट कराटे असाेशिएशन्सचे चे मंगेश भोंगाडे,त्याच प्रमाणे त्यांच्या आई रत्नमाला , वडील रंगीलदास ,पत्नी रुपाली मुलगा सोहम , मुलगी दृष्टी ,बहिणी व आप्तपरिवार या वेळी उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विक्रम भांडवलकर , प्रा. शुभम पोलोजवार, प्रतीक चौधरी,निलेश जुगनाके ,गजानन मेश्राम, संजय ठाकूर ,प्रशांत आत्राम, देवळी एक्स बीएसएफचे जावेद , जवान प्रशिक्षण केंद्राचे अनिकेत काथे, प्रतीक हालुले, सुरज चौधरी, विशाल चौधरी ,जगदीश राऊत ,राज सिंग यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here