आर्णीत ठाणेदारांची फेरिवाल्यावर जोरदार कारवाई, आता कसे मोकळे मोकळे!
समीर मलनस
आर्णी पोलिस ठाण्याला नव्याने रुजू झालेले ठाणेदार पितांबर जाधव यांनी रुजू होताच केलेल्या कारवाई मध्ये मुजोर रिक्षावाले, फेरिवाले व दुकानदार यांना चोप दिला आहे. त्यांच्या विरोधात काही दुकानदार बोलतांना दिसत आहे मात्र अजुनही काही दुकानदार रस्त्यावर ओव्हर लोड ट्रक अभे करुन माल खाली करीत आहे शहरात फेरिवाला मुक्त कारवाई नंतर फुटपाथवर एकही फेरिवाला दिसलेला नाही पुढच्या काही दिवसात आर्णी फेरिवाला मुक्त करण्याचा विडाच ठाणेदार जाधव यांनी उचलला आहे त्यामुळे कारवाई नंतर आज आर्णी शहरात सगळ काही सुरळीत आहे. ठाणेदारचा बाहुबली अवतार काल आर्णीकरांना अनुभवता आला.
पोलिस प्रशासनाने शहरातील फेरिवाले, दुकानदार व रिक्षावाल्यांवर जोरदार कारवाई केली असून सुमारे 100 ते 200 दुकानासमोरील अतिक्रमण असलेले शेड काढण्यात आले काही रिक्षावाले मुजोरीने रिक्षा रस्त्यावर उभे करतात अशा मुजोर रिक्षा चालकांनाही ठाणेदारांनी स्वःता चोप देत चांगलाच धडा शिकवला यावेळी अवैध पार्किंग करणार्यावर कारवाही करण्यात आली परंतु भविष्यात परिस्थिती जैसेथेच राहणार कि बदल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तसेच शहरातील फेरिवाल्यांचा प्रश्न कायमचा मार्गी लावावा त्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी अशी मांगणी आर्णीकरांनी केली आहे.