मॅजिक बस इंडिया फाउंडेशन तर्फे बाल विवाह प्रतिबंध दिवस इटोली येथे साजरा
नागेश नेवारे (6 नोव्हेंबर)
मॅजिक बस इंडिया फाउंडेशन च्या वतीने बल्लारपूर तालुक्यातील इटोली येथे 1 नोव्हेंबर 2006 बाल विवाह प्रतिबंध कायदा ह्या दिवसाचे औचित्य साधून बाल विवाह प्रतिबंध दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचा उद्देश the prohibition of child marrage act 2006 च्या कलमांबद्दल मूल – मुलींमध्ये, पालकांमध्ये जनजागृती करणे पालकांना मूल- मुलींचे किमान 12 वि पर्यंत चे शिक्षण पूर्ण करू देण्यासाठी प्रवृत्ती करणे, सोबतच समुदयामध्ये जनजागृती करून कोणत्याही मुलाचे लग्न 21 वर्ष्याच्या आधी व मुलींचे लग्न 18 वर्ष्याच्या आधी होऊ न देणे हा आहे.
कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी हे वेगवेगळ्या वेशभूषेत सहभागी होऊन गावामध्ये रॅली च्या माध्यमातून एक संदेश देऊन जनजागृती करण्यात आली. आणि पालक तसेच गांवकरी यांचा उत्स्फूर्त सहभाग व सहकार्य लाभले.
कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून मॅजिक बस चे शाळा सहाय्यक अधिकारी मा. प्रतीक दुर्गे उपस्थित होते. तर गावातील पोलीस पाटील, शिक्षकवृंद, सरपंच आदि मान्यवरांच्या परवानगीने हा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मॅजिक बस चे समुदाय संघटक मा. माणिकचंद जुवारे मा.बआकाश सोयाम यांनी परिश्रम घेतले.