रामदेगी येथील प्रवेशद्वारा जवळील नाका तात्काळ हटवा! वनविभागाने दिलेली नोटिस मागे घ्या!
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी याणा दिले निवेदन
विकास खोब्रागडे
चिमुर तालुक्यातिल रामदेगी येथील संघारामगिरी हे बौद्ध अनुयायांचे श्रद्धास्थान आहे, तसेच रामदेगी हे हिन्दू धर्माचे पुरातन श्रद्धा स्थान आहे, मागील 40 वर्षापासून बौद्ध धर्म गुरु भिक्खु संघाचे आश्रय स्थान आहे, रामदेगी येथे श्रावन महिन्यात 5 सोमवारला मोठी यात्रा भरत असून जानेवारी महिन्यातिल 30 व 31 जानेवारीला धम्म समारम्भ कार्यकरामत हजारों बौद्ध अनुयानयांच्या उपस्तित प्रतेकि वर्षी साजरा केला जातो, फार पूर्वी पासून हिन्दू ऋषिमुनि, धर्मगुरु तसिच बौद्ध भंते हे रामदेगी जंगलातील पहाड़ी भागात जाऊन ध्यान, साधना, तापचर्या, विपश्यना करून गावात जाऊन सामाजाला उपदेश करीत असतात, त्यामुळे आतही हिन्दू धर्मगुरु व बौद्ध भंते घनदाठ जंगलात राहून तपस्चर्या करीत आहेत.
वनविभागाच्या बफर झोंन मधील वनपरिक्षेत्र अधिकार्यनी संघरामगिरी येथील बौद्ध भिक्खु दन्याज्योति थेरो, तपोवन बुद्धविहार भिक्खु संघ संघरामगिरी यांच्या नावाने तर रामदेगी देवस्थान याणा सुधा नोटिस दिली असून अतिक्रमण काढ़न्याबाबत नोटिस दिल्यामुळे वंचित बहुजन आघाडी चिमुर तालुक्याच्या वतीने उप विभागीय अधिकारी प्रकाश संम्पकाळ याणा निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी राज्यमंत्री रमेशकुमार गजभे वंचित बहुजन आघडी तालुका अध्यक्ष स्नेहदीप खोबरागड़े, राजू झोड़े,शालिक थुल, मनोज राऊत, प्रदीप मेश्राम, विनोद सोरदे, भाग्यवान नंदेश्वर, सारंग दाभेकर, प्रकाश मेश्राम, मोरेश्वर रामटेके, राहुल पाटिल, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.