चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करून मदत द्या!
आ.किर्तीकुमार भांगडीया यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे मागणी
चिमूर
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभा क्षेत्रात चिमूर नागभीड ब्रम्हपुरी व सिंदेवाही तालुक्यातील मोठया प्रमाणात लागवड केलेल्या धान व अन्य पिकावर मावा तुडतुडा व अन्य रोगांच्या प्रादुर्भाव मुळे संपुर्ण पीक नष्ट होत झाल्याने प्रत्यक्ष बांधावर जाऊन सर्वेक्षण करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे .
चिमूर विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड असताना मावा तुडतुडा व अन्य रोगामुळे पिके नष्ट झाल्याचे दि ३०, ३१ ऑक्टोबर च्या प्रत्यक्ष दौऱ्यात निदर्सनास आले आहे.
अलीकडे कोरोना १९ परिस्थितीत शेतीशिवाय पर्याय नसताना शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात मोलमजुरी तर गहाण व कर्जाने धान पिकांचे महागडे बीज घेऊन लागवड केली असल्याचे दिसते धान पिकांची सर्वसाधारण वाढ व उत्पादन कठीण स्थितीत असताना माहे आगस्ट 20 मध्ये सततधार पाऊस व वैनगंगा नदीचा महापूर प्रकोप तसेच मान्सून परतीचा पाऊस आणि वातावरणातील बदल अश्या अनेक कारणांमुळे धान पिकावर परिणाम होऊन मावा तुडतुडा व अन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत गेला महागडी पीक फवारणी ही कामात आली नाही केमिकल युक्त तनिस ही जनावरांच्या उपयोगात येणार नाही
संबंधित कृषी व महसूल विभागास कोणत्याही सूचना आदेश अधापही प्राप्त न झाल्याने धान पीक अहवाल प्रलंबित झाल्याने शेतकरी हवालदिल होणार आहे
चंद्रपूर जिल्ह्यात अत्यल्प उत्पादन होण्याच्या भीतीने चिंताग्रस्त धान उत्पादक शेतकरी पिकांना जळून नष्ट करण्याच्या शोकाकुल स्थितीत आहे जिल्हा प्रशासनास सर्वेक्षण चे अधिकारच नसल्याने प्रत्यक्ष पाहणी अभावी अहवाल प्रलंबित आहे चंद्रपूर जिल्ह्यात कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने घटणारे धान पीक या गंभीर प्रकरणी शासनाने तात्काळ कृषी तज्ञ द्वारे बाधित परिसरात भेट देऊन सर्वेक्षण करून उपाय योजनेची आवश्यकता आहे
चिमूर विधानसभा क्षेत्रातील धान पिकांचे सर्वेक्षण करून आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे यांना दिलेल्या निवेदनातून आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी केली आहे .