भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या प्रणय कापगते चा सत्कार
इन्स्पायर करिअर अकॅडमीचा नाविन्यपूर्ण उपक्रम
ब्रह्मपुरी : भारतीय सैन्य दलात निवड होणे म्हणजेच देशाची सेवा करण्याची सुवर्णसंधी चालून येणे होय. अशी संधी इन्स्पायर करिअर अकॅडमी चा विद्यार्थी प्रणय कापगते या विद्यार्थ्याला मिळाली. प्रणय ची निवड सैन्यदलात झाल्यामुळे त्याचा सत्कार इन्स्पायर करिअर ॲकॅडमी तर्फे करण्यात आला या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी इन्स्पायर करिअर अकॅडमी चे मार्गदर्शक मा. आंबोरकर सर हे उपस्थित होते, प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी राहुल जाधव तसेच अनअकॅडमी चे मार्गदर्शक प्रा. प्रकाश इंगळे सर, सेमस्कर सर तसेच इन्स्पायर ॲकॅडमी चे संचालक प्रा. लक्ष्मण मेश्राम सर उपस्थित होते सदर सोहळ्याप्रसंगी उपस्थित मार्गदर्शकांनी प्रणय चे कौतुक करून इतरांनीही त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी व स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करावं अशी इच्छा व्यक्त केली त्याचप्रमाणे प्रणय ला पुढील जीवनासाठी शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या आपल्या मार्गदर्शनात प्रकाश इंगळे सर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व पटवून देत स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी याबद्दल सखोल मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे आंबोरकर सर यांनी सुद्धा स्पर्धा परीक्षेचे जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. लक्ष्मण मेश्राम सर यांनी केले संचलन स्नेहल बेदरे तर आभार प्रदर्शन शालू उपरीकर हिने केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गौरव ठोंबरे श्रेयस , विपाली येडेवार,ज्योती राऊत,उज्वला निंबकर,पल्लवी खेत्रे, दीपाली चाचेरे शुभम गुरुनुले ,मंगेश ढोरे , महेश कोलते इत्यादींनी सहकार्य केले.