कोरोना जनजागृती काव्यधारा – १३
कवी – राजेंद्र घोटकर, घुग्गूस
गझल : प्रकोप कोरोनाचा…
कोरोनाचा प्रकोप भारी छळतो आहे
मानवतेवर कलीकाळ हा हसतो आहे.
कशी आपदा येऊन पडली जीवावर या
कसा विषाणू जीवाला ह्या छळतो आहे.
क्षणभंगुर हे जीवन अपुले कळले आता
कुटुंबासवे क्षणाक्षणाला जपतो आहे.
कुटुंब माझे हीच आपली जबाबदारी
म्हणून आता घरी रोज मी बसतो आहे.
चला हरवू या सारे मिळुनी कोरोनाला.
आत्मनिर्भर होऊन आपण जगतो आहे.
गझलकार : राजेंद्र एन. घोटकर, घुग्घूस
संपर्क- ९५२७५०७५७६
(महाराष्ट्र शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेला सहाय्य म्हणून फिनिक्स साहित्य मंच द्वारा सदर विषयावर ऑनलाईन कविसंमेलन पार पडले. यात सहभागी कविंच्या कोव्हीड-१९ बाबत जनजागृतीपर कविता आम्ही आपणास देत आहोत.)
•••••