उद्या कोरपना येथे भव्य महाआरोग्य शिबिर
कोरपना :- मा. आमदार सुधिरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र, भाजपा जनसंपर्क कार्यालय कोरपना तथा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय मेघे सावंगी याच्या संयुक्त विद्यमाने कोरपना येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवरावदादा भोंगळे यांचा वतीने दि. २७ एप्रिल २०२५ रोज रविवार ला वेळ सकाळी ०९.०० ते दुपारी ०२.०० वा. पर्यंत, स्थळ जिल्हा परिषद शाळा कोरपना येथे केले आहे.
या शिबिरात खालील तज्ञ उपस्थित राहणार असून संबंधित आजारावर मोफत तपासणी, उपचार व शस्रक्रिया केल्या जाईल. मेडिसीन तज्ञ, नेत्र रोग तज्ञ, सर्जरी तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, कान नाक घसा तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मुखरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, सर्व प्रकारचा आजारावर मोफत तपासणी केल्या जाईल.
विशेष म्हणजे शिबिरात येतांना रुग्णांनी आधार कार्ड व केशरी/ पिवळे रेशन कार्ड सोबत आणावे. शिबिरानंतर पुढील ०१ महिन्याच्या कालावधीकरिताच मोफत उपचार करून देण्यात येतील. परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या भव्य महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा तालुका अध्यक्ष संजय मुसळे, भाजपा महामंत्री सतीश उपलेंचवार, व भाजपा कोरपना शहर अध्यक्ष अमोल आसेकर यांनी केले आहे.