वढा, धानोरा, अंतुर्ला, येरूर, सोनेगाव येथे चौकाचौकात 50 सिमेंट बेंचेसचे वितरण
ग्रामस्थांच्या सोयीसाठी सामाजिक उत्तरदायित्वाचे सकारात्मक पाऊल
घुग्घूस :- धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि पहेल मल्टिपर्पज सोसायटी, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक उत्तरदायित्वाच्या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत वढा, धानोरा, अंतुर्ला, येरूर,आणि सोनेगाव याप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी बसण्यासाठी एकूण 50 सिमेंट बेंचेसचे वितरण करण्यात आले. धारीवाल कंपनीचे मुख्यमहाप्रबंधक देवेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी सुसज्ज बसण्याची सुविधा पुरवणे आणि त्यांच्या दैनंदिन गरजांना आधार देणे हा होता. गावातील चौक, मंदिरे, बुद्ध विहार, बसथांबे या ठिकाणी हे बेंचेस बसविण्यात आले असून, त्यामुळे वृद्ध, महिला, पुरुष व इतर ग्रामस्थांना आरामदायी सोयी उपलब्ध झाल्या आहेत.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य व्यवस्थापक,(धारिवाल) पुंडलिक वानवे, मुख्य व्यवस्थापक डॉ. अनिश नायर, उप व्यवस्थापक धीरज ताटेवार तसेच संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच आणि पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चरच्या सामाजिक बांधिलकीची प्रशंसा केली. सार्वजनिक हित लक्षात घेऊन उचललेले हे पाऊल नक्कीच अनुकरणीय असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजुषा काकडे यांनी तर संयोजन व यशस्वी आयोजनासाठी दिनेश कामतवार, सपना येरगुडे, आशिष हलगे यांनी मोलाचे योगदान दिले.