गोंडपिपरीत सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करा!
गोंडपिपरी यंग ब्रिगेडची मागणी
गोंडपिपरी (किरण घाटे) : चंद्रपूर जिल्ह्यातील
गोंडपिपरी तालुक्यात कापूस आणि धानाचा मोठ्या प्रमाणात पेरा झाला आहे. अश्यातच तालुक्यातील नद्यांना आलेल्या महापुरामुळे सीमावर्ती भागात असलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. सोबतच यंदाचे वर्ष बळीराजाची अग्नीपरीक्षा पाहणारे ठरले आहेत. अस्मानी-सुलतानी अशी दोन्ही संकटांना झेलत शेतकरी हवालदिल झाला आहे. असे असताना गोंडपिपरी तालुक्यात कसे बसे आता पीक हाती येऊ लागले आहेत सध्याच्या परिस्थितीत गोंडपिपरी तालुक्यात असलेल्या चार कापूस खरेदी केंद्र पैकी एकाही केंद्राला सीसीआयची मान्यता देण्यात आली नाही. यामुळे पांढरे सोने असलेल्या कापसाला खाजगी व्यापारी मिळेल त्या भावात घेत आहेत तदवतच बळीराजा यांची आर्थिक पिळवणूक होत आहेत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यातील 25 धान खरेदी केंद्रांना मान्यता दिली असुन यात मात्र गोंडपिपरी तालुक्याला वगळण्यात आले आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळणार नसल्याचे चिन्ह एकंदरीत दिसु लागले आहे. महाभयानक कोरोनामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यावर हा अन्याय असून गोंडपिपरी तालुक्यात सीसीआयची कापूस खरेदी केंद्र यासह धानाचे अधिकृत खरेदी केंद्र गोंडपिपरी तालुक्यात देण्यात यावे. अशी मागणी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या एका निवेदनातून केली आहे. यावेळी यंग ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष सुरज माडुरवार, तालुका कार्याध्यक्ष निकेश बोरकुटे, मिलिंद अलोने, विठलवाडा शाखाअध्यक्ष संतोष उराडे, तालुका सचिव प्रमोद दुर्गे, प्रसिध्दी प्रमुख गौरव घुबडे, नबात सोनटक्के, अक्षय कोहपरे, मंगेश बट्टे आदि उपस्थित होते.