देशाला महात्मा फुलेच्या विचारांची गरज : राजुरेड्डी
काँग्रेस कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
घुग्घूस : भारतीय इतिहासातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते प्रसिद्ध विचारवंत लेखक समाज सुधारक जोतिराव गोविंदराव फुले अर्थात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनानिमित्त शहर काँग्रेस कार्यलयात काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
ज्योतीराव तसेच त्यांच्या धर्मपत्नी सावित्रीबाई फुले यांनी 1848 साली पुण्यातील तात्यासाहेब भिडे यांच्या भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा शुरु केली.
याशाळेला त्याकाळात प्रचंड असा विरोध होत असतांना उस्मान शेख व त्यांची धर्मपत्नी फातिमा शेख या फुले दाम्पत्या सोबत पूर्ण ताकदीनिशी उभे राहिले.
याकाळात शूद्र तथा शोषित वंचित समाजाला मुख्य प्रहावात शामिल करण्यासाठी त्यांना समान हक्क मिळवून देण्या करीता फुले यांनी सत्य शोधक समाज संघटना निर्माण केली
यात सर्व जाती धर्मातील लोक शामिल होऊ शकत होते.
जाती धर्मातील असपृश्यता अंधश्रद्धा वाईट चालीरीती विरोधात फुले यांनी सतत आवाज उठवीला त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन 1888 साली सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव वंडेकर यांनी महात्मा ही पदवी प्रदान केली.
त्यांच्या लेखणीतून सामाजिक विषमतेवर प्रहार करणारी “शेतकऱ्याचे आसूड ‘ हे प्रसिद्ध ग्रंथ येणाऱ्या पिढीला ही मार्गदर्शक असून सध्या परिस्थिती देशाला महात्मा ज्योतीरावांच्या विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी केले.
याप्रसंगी महिला शहर कार्याध्यक्ष दिप्तीताई सोनटक्के, काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, रोहित डाकूर, सुनील पाटील, दिपक पेंदोर, कपिल गोगला, शहंशाह शेख, रंजीत राखुंडे व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.