आरोग्य महिला सेवक पद भरतीत उमेदवारांवर अन्याय

0
32

आरोग्य महिला सेवक पद भरतीत उमेदवारांवर अन्याय
उमेदवारांना न्याय देण्याची वंचित बहुजन युवा आघाडीचे उपाध्यक्ष सिद्धांत पुणेकरची मागणी

चंद्रपूर : जिल्हा परिषद अंतर्गत घेण्यात आलेल्या आरोग्य महिला सेवक पद भरती मध्ये जीएनएम, बीएससी नर्सिंग झालेला महिला उमेदवारावर अन्याय होत आहे. तसेच हायकोर्टाने देखील उच्च शिक्षितांना डावलू नका असे आदेश असतानाही महिला उमेदवारांवर अन्याय होत आहे. या मागणीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देण्याची मागणी वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सिद्धांत पुणेकर यांनी केली. महाराष्ट्र राज्यात सर्व जिल्हा परिषद अंतर्गत 2023 मध्ये झालेला आरोग्य परिचारिका आरोग्य सेवक महिला पद भरती ही आयबीपीएस कंपनी मार्फत जून ते जुलै 2024 दरम्यान महाराष्ट्रभर ऑनलाईन केंद्रावर घेण्यात आलेल्या परीक्षेकरिता विविध जिल्हा परिषद मार्फत देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रतेच्या अटीमध्ये ज्यांची अहर्ता प्राप्त सहकारी प्रसवीका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील असे नमूद करण्यात आलेले होते. त्याचप्रमाणे राज्यभरातून जीएनएम, बीएससी, नर्सिंग मुलीचे फॉर्म भरून घेण्यात आले. या परीक्षा घेण्यात आल्या. कागदपत्र पडताळणी करण्यात आली, परंतु त्यानंतर अचानक जीएनएम, बीएससी नर्सिंग झालेल्या विद्यार्थिनी जिल्हा परिषद अधिनियम 1967 अन्वये आपणास अपात्र करण्यात येत आहे. असे पत्र ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी 30 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून या पद भरती करिता केवळ एएनएम पदवीधारकच पात्र असल्याचे सांगितले त्यानुसार आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले परिणामी जिल्हा परिषदेने त्यानुसार अपात्र सर्व यादी जिल्हा परिषद मार्फत लावण्यात आली. जिल्हा परिषद अधिनियम 1967 अन्वये सदरील पदाकरिता नमूद करण्यात आलेल्या शैक्षणिक अटीमध्ये परिशिष्ट पाच ( दोन ) ( अ ) भारतीय परिचर्या परिषदेने मान्यता दिलेली बीएससी परिचर्या ही पदवी धारण करीत असतील किंवा ( ब ) प्राप्त परिचारिका प्रसावीका किंवा अहर्ता प्राप्त परिचारिका असतील आणि तीन ज्यांची महाराष्ट्र परिचर्या या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या या परिषदेमध्ये नोंदणी झाली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असलेल्या अशा उमेदवाराकडून नामनिर्देशांनाद्वारे नेमणूक करण्यात येईल असे स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे. या कारणास्तव कोणतेही जीएनएम, बीएससी नर्सिंग विद्यार्थीनी अपात्र होत नाहीत. आणि मुंबई हायकोर्टाने सुद्धा उच्चशिक्षितांना तुम्ही डावलू शकत नाही असे स्पष्ट म्हटले आहे. जीएनएम व बीएससी नर्सिंग हे एएनएम पेक्षा उच्चस्तरीय अभ्यासक्रम आहेत. एएनएम अभ्यासक्रम दोन वर्षे, जीएनएम अभ्यासक्रम साडेतीन वर्षे तर बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम चार वर्षाचा कालावधीचा आहे. तरीसुद्धा राज्य सरकारने गुणवत्तेला केराची टोपली दाखविली आहे असा परखड आरोप वंचित बहुजन युवा आघाडी चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष सिद्धांत पुणेकर यांनी केला व महिला उमेदवारांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची मागणी केली. अन्यथा महिला उमेदवारांना सोबत घेऊन आंदोलनाचा पवित्रा घेऊ असे एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here