२०२०-२१ सत्रातील ५०% शैक्षणिक शुल्क सवलत देण्यात यावे:- राजु झोडे
वाढत्या शैक्षणिक फी बाबत पालक वर्गात असंतोष
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी मागील आठ ते नऊ महिन्यांपासून ताळेबंद सुरू आहे. या काळात सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाच्या समस्या बरोबरच आर्थिक समस्येलाही सामोरे जावे लागत आहे. या मंदीच्या काळात अनेक जणांनी नोकरी देखील गमावलेली आहे.याकाळात अनेक खाजगी कंपन्या व उद्योगधंदे बंद झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. या आर्थिक संकटाच्या काळात दैनंदिन जीवन जगणे अशक्य होत असतांना शाळेकडून शुल्काची वारंवार मागणी होत असल्यामुळे पालक वर्ग हतबल होऊन त्यांच्यात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षीचे सत्र सुद्धा अर्ध्यापेक्षा जास्त झालेले आहे कोरोनाच्या संकटामुळे शाळा कधी उघडणार हे सुद्धा गुलदस्त्यात आहे. ही आजची परिस्थिती असताना शासनसुद्धा यावर काही निर्णय घेतानाचे चिन्ह दिसत नाही. मुलांना ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये मोबाईल व रिचार्ज खर्च वाढलेला असून पालकांना विद्यार्थ्यांची पूर्ण फी देणे कठीण झालेले आहे. याबाबत पालकांनी बरेचदा निवेदन सुद्धा देऊन शुल्कामध्ये सवलत देण्याची मागणी केली आहे. परंतु अजून पावेतो यावर निर्णय लागलेला नाही. ही बाब अतिशय गंभीर असून याबाबतचे निवेदन राजू झोडे यांच्या नेतृत्वात पालकवर्गांनी सेंट मेरी हायस्कूल बल्लारपूर व्यवस्थापनाला दिले.
तरी याबाबत सविस्तर विचार करून वरील मागणी पूर्ण करावी याकरिता राजू झोडे व पालक वर्गाने निवेदन दिले. जर वरील मागणी पूर्ण झाली नाही तर जिल्ह्यातील सर्व पालकवर्गाला घेऊन रस्त्यावर उतरू असा इशारा राजु झोडे व रुपेश मानकर , सचिन गायकवाड,प्रमोद भाले , रोशन बोरकर, बंन्डु कृष्णपलीवार , सुधिर भाऊ, चिमनकर ताई, संध्या मेश्राम ताई, राकेश रत्नपारखी,विना एडेलकर पालक वर्गाने संबंधित प्रशासनाला दिला.