चैत्र नवरात्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर महाकाली मंदिरात स्वच्छता मोहीम
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने उपक्रम, बैठक घेत तयारींचा आढावा…
३ एप्रिलपासून चंद्रपूरात चैत्र नवरात्र यात्रेला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून महाकाली मंदिर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत चंद्रपूर शहर महानगरपालिका, भारतीय जनता पक्ष, श्री महाकाली माता महोत्सव समिती, महाकाली मंदिर ट्रस्ट आणि महाकाली भक्त यांनी संयुक्त सहभाग घेतला.
यावेळी मनपा आयुक्त विपिन पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, संतोष गर्गेलवार, स्वच्छता अधिकारी डॉ. अमोल शेडके, श्री महाकाली माता ट्रस्टचे श्याम धोपटे, अजय जयस्वाल, सुनील महाकाले, मिलिंद गंपावार, अजय वैरागडे, भाजपचे ज्येष्ठ नेते विजय राऊत, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, तुषार सोम, भाजप नेते प्रकाश देवतडे, दशरथसिंह ठाकूर, मनोज पाल, प्रमोद शास्त्रकार, माजी नगरसेवक राजेंद्र अडपेवार, प्रदीप किरमे, श्याम कणकम, दिवाकर पुडट्टवार, गणेश गेडाम, वंदना हातगावकर, सविता दंढारे, संजय बुरघाटे, करणसिंग बैस, सलीम शेख, कालीदास धामनगे, विनोद अनंतावर, प्रतीक शिवणकर, मंजुश्री कासनगोट्टूवार, प्रज्ञा गंधेवार, आशा देशमुख, सुबोध चिकटे, शंकर दंतुलवार आदींची उपस्थित होते.
महाकाली मंदिर परिसरात चैत्र नवरात्रोत्सवाच्या स्वागतासाठी ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मंदिर परिसर स्वच्छ आणि सुशोभित करण्याच्या उद्देशाने विविध सामाजिक आणि शासकीय संस्थांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. यात्रेच्या काळात महाकाली मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. यात्रेच्या पार्श्वभूमीवर परिसर स्वच्छ आणि सुरळीत रहावा, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी पुढाकार घेत व्यापक स्वच्छता अभियान हाती घेतले. मंदिर परिसरातील रस्ते, सभामंडप, मंदिर प्रांगण आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्यात आली. कचरा संकलन, निर्जंतुकीकरण आणि पर्यावरणपूरक व्यवस्थेवर विशेष भर देण्यात आला. यात्रेच्या काळात भाविकांना कोणत्याही प्रकारच्या अस्वच्छतेचा त्रास होऊ नये, यासाठी विशेष स्वच्छता पथक तैनात करण्याच्या सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी बैठक घेऊन यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला. त्यांनी महाकाली मंदिर परिसरातील स्वच्छता, भाविकांसाठी असलेल्या सुविधा आणि गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा केली. महाकाली मंदिर हे चंद्रपूरचे धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र असल्याने येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, असे ते म्हणाले.
महाकाली यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी आमदार किशोर जोरगेवार सातत्याने पाठपुरावा करत आहेत. यात्रेच्या कालावधीत उत्तम सुविधा निर्माण करण्यासाठी त्यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत ठरविलेल्या उपाययोजनांची पूर्तता तपासण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांसह महाकाली मंदिर परिसराची पाहणी केली आणि आवश्यक सूचना दिल्या होत्या. आज त्यांनी स्वतः पुढाकार घेत मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. यात्रेच्या दरम्यान गर्दी नियंत्रण, स्वच्छतेच्या कायमस्वरूपी उपाययोजना आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने आवश्यक तयारी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.