उद्या गडचांदूर येथे भव्य महाआरोग्य शिबिर

0
62

उद्या गडचांदूर येथे भव्य महाआरोग्य शिबिर

 

गडचांदूर :- मा. आ. सुधिरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र, भाजपा जनसंपर्क कार्यालय गडचांदूर तथा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी याच्या संयुक्त विद्यमाने गडचांदूर येथे भव्य महाआरोग्य शिबिर (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) आयोजन दि. २३ मार्च २०२५ रोज रविवार ला वेळ सकाळी ०९.०० ते दुपारी ०२.०० वा. पर्यंत, स्थळ स्व.भाऊराव पाटील चटप आश्रम शाळा, येथे केले आहे.

या शिबिरात खालील आजारांची मोफत तपासणी, उपचार व शस्रक्रिया केल्या जाईल. मेडिसीन तज्ञ, नेत्र रोग तज्ञ, सर्जरी तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, कान नाक घसा तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मुखरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, इत्यादी रोगावरील आजारावर मोफत तपासणी केल्या जाईल.

विशेष म्हणजे शिबिरात येतांना रुग्णांनी आधार कार्ड व केशरी/ पिवळे रेशन कार्ड सोबत आणावे. शिबिरानंतर पुढील ०१ महिन्याच्या कालावधीकरिताच मोफत उपचार करून देण्यात येतील. परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या भव्य महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा तालुका अध्यक्ष संजय मुसळे, भाजपा महामंत्री सतीश उपलेंचवार, व भाजपा गडचांदूर शहर अध्यक्ष अरुन डोहे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here