दिवसेंदिवस सुर्य आग ओकत आहे…

0
4

दिवसेंदिवस सुर्य आग ओकत आहे…

नागरिक व औद्योगिक कर्मचारी कामगार उष्णतेमुळे हैराण?

पंकज रामटेके

संपूर्ण देशभरात सुर्य आग ओकत असताना पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा चांगलाच वाढत चालला आहे. घुग्घुस शहरात तर रेकार्ड ब्रेक होण्याची शक्‍यता होणार आहे. तापमान वाढत,वाढत ४० अंशांवर पोहचले, परंतु गेल्या काही वर्षात अनेक ठिकाणी उष्णतेची विक्रमी नोंद करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण जगातच सुर्य आग ओकत आहे.

औद्योगिक कंपनी भोवताल घुग्घुस शहर असल्याने लई दिखत परिस्थितीत नांगरिकांना परिशानीने दिवस काढाले लागते.

परिसरातील औद्योगिक कंपनीने कर्मचारी कामगारांकडून कडक उन्हात कमी काम देण्याची गरज भाजत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या सूर्य चांगलीच आग ओकत आहे. दुपारनंतर घराच्या बाहेर पडणे अशक्य झालेले आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पारा वाढतच आहे. सकाळी ८ ते सांयकाळी ६:३० वाजेपर्यंत शहरात सूर्यदेवतेचा उष्णतेचा पारा भडकला असून सुर्य आग ओकत असताना दिसुन येत आहे.

दिवसेंदिवस वाढत्या उन्हाचे चटके यामुळे पशुपक्ष्यांच्या तसेच मानवी जीवनावर परिणाम होत आहे. उष्माघाताचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. घुग्घुस शहरात तापमानापासुन नागरिकाची सुटका होईल, अशी कोणतेही चिन्ह दिसून येत नाहीत.उन्हाचे तीव्र चटके जाणवत आहे. दुपारनंतर काम करणे जवळपास अशक्य होत आहे. यामुळे नागरिकांनी दुपारी बाहेर पडणे टाळून शक्य असल्यासच बाहेर पडावे तसेच उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता सरासरीपेक्षा अधिक आहे.
उन्हाळ्याच्या बाबतीत आपण सचेत राहणे गरजेचे आहे. सहनशील असणे वाईट नाही,पण निष्काळजीपणाने वागणे चुकीचे आहे. पंखे, कूलर,एसी,कदाचित सर्वांना परवडणार नाहीत, पण भरपूर पाणी पीत राहणे, दही, ताक,लस्सी, नारळपाणी,उसाचा रस पिणे, खरबूज, टरबूज,काकडी खाणे,बाहेर पडताना टोपी, स्कार्फ घालणे, छत्री धरणे, असे किती तरी सोपे उपाय आहेत जे आपल्याला संभाव्य उष्माघातापासून वाचवू शकतात. शेवटी, भारत हा एक उष्ण कटिबंधीय देश आहे, आपला संबंध थेट सूर्याशी आहे आणि आपल्याला उष्णतेपासून सुटका नाही ही जाणीव आपण नेहमीच मनात बाळगायला हवीत.
डोक्यावर टॉवेल किंवा रुमाल बांधून बाहेर पडावे. स्वतःच्या व इतरांचीही काळजी घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here