घुग्घूस शहरातील वाढती पाणी टंचाई दूर करण्यासाठी उद्योगातर्फे वॉटर टँकर उपलब्ध करून घ्या!

0
17

घुग्घूस शहरातील वाढती पाणी टंचाई दूर करण्यासाठी उद्योगातर्फे वॉटर टँकर उपलब्ध करून घ्या!

काँग्रेसचे नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी

 

घुग्घूस : शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजुरेड्डी हे गेल्या अनेक वर्षांपासून शहरात बारा महिने स्वतः च्या खाजगी वॉटर टँकर द्वारे मोफत पाणी पुरवठा करीत आहे.
हे पाणी पुरवठा करीत असतांना शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी शहराला कमीत – कमी वीस वॉटर टँकरची आवश्यकता भासणार असल्याने काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांना निवेदन देऊन शहरातील लॉयड्स मेटल्स, एसीसी,व वेकोली ( WCL ) या सर्व कंपन्यातर्फे प्रत्येकी पाच टँकर उपलब्ध करून घ्यावे तसेच या वॉटर टँकरला लागणारा पाणी ही टँकर देणाऱ्या कंपनी कडूनच घेण्यात यावा

कारण शहराला लागणारा संपूर्ण पाणी पुरवठा हा वेकोलीच्या वॉटर फिल्टर प्लांट मधूनच होत असतो.
राजीव रतन चौकातील रेल्वे सिग्नल हे वारंवार बंद पडत असल्यामुळे तसेच रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने याठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होत असते यामुळे फिल्टर प्लांट मधून येणारे व जाणारे वॉटर टँकर हे वाहतूक कोंडीत अडकत असल्याने या वॉटर टँकरच्या फेरी अगदी कमी लागत असल्याने नागरिकांना पाणी मिळत नाही.
याकरिता लॉयड्स मेटल्स व एसीसी कंपनीने आपल्या उद्योगातुन वॉटर टँकर सोबत पाणी उपलब्ध करून द्यावा याकरिता नगरपरिषदेने प्रयत्न करावे व शहराला पाणी समस्ये पासून मुक्त करावे अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here