ताडाली येथे आरोग्य शिबिरात शेकडो कामगारांची आरोग्य तपासणी
घुग्घूस : सनविजय अलॉय अँड पावर लिमिटेड चंद्रपूर व पहेल मल्टीपर्पज सोसायटी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने व मुख्य महाप्रबंधक मा.श्री. रथीलाल अग्रवाल सर यांच्या मार्गदर्शनातून आरोग्य विषय कामगारांच्या समस्या लक्षात घेता व बदलत्या वातावरणामुळे आरोग्यावर होणारा परिणाम यामुळे सनविजय कंपनी व पहेल संस्थेने पुढाकार घेऊन कामगारासाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले.
यावेळी उद्घाटक म्हणून मा. श्री. रथीलाल अग्रवाल (मुख्य महाप्रबंधक सनविजय कंपनी) मा. श्री. राकेश तिवारी ( मुख्य व्यवस्थापक सनविजय कंपनी) उपस्थिती होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा .श्री .राकेश तिवारी सर यांनी केले. उद्घाटक म्हणून बोलत असताना मा. श्री. रथीलाल अग्रवाल सर यांनी कामगारांना आरोग्याच्या काळजीसंदर्भात मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संचालन सौ अंजु काकडे यांनी केले तर आभार अर्चना मोहितकर यांनी मानले हा कार्यक्रम उत्तम रित्या पार पाडण्यासाठी पहेल मल्टीपर्पज सोसायटी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. या शिबिरामध्ये एकूण २४० कामगारांची तपासणी करण्यात आली व मोफत औषधी वितरण करण्यात आले.