घुग्घुस येथे दिव्यांग मार्गदर्शन मेळावा संपन्न
अपंग विकास समिती, चंद्रपूर तथा अपंग मार्गदर्शन केंद्र घुग्घुस द्वारा आयोजित दिव्यांग मार्गदर्शन मेळावा २०२५ हा कार्यक्रम दि.९ मार्च २०२५ रोज रविवारला मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय माननीय आमदार किशोरभाऊ जोरगेवार विधानसभा क्षेत्र चंद्रपूर. प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री. धनंजय साळवे सर, समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर तथा प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री निलेश रांजनकर, मुख्याधिकारी नगरपरिषद, घुग्घुस तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री.संतोष भाऊ नुने माजी सरपंच घुग्घुस तसेच मंचावर उपस्थित आदरणीय लक्ष्मीबाई चांदेकर माजी सरपंच,ग्रामपंचायत घुग्घूस,प्रा. प्रकाश सातार्डे, प्रियदर्शनी कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय घुग्घुस, श्री.पवार साहेब समाज कल्याण अधिकारी समाज कल्याण,विभाग अदानी फाउंडेशन एसीसी, घुग्घुस तसेच श्री.बंडूभाऊ चांदेकर, अध्यक्ष अपंग मार्गदर्शन केंद्र, घुग्घुस,निर्मलाताई घागरगुंडे, श्री. भारत साळवे, समाज सेवक, श्री. देवराव बंडेवार अध्यक्ष, अपंग कल्याण समिती, शेणगाव, श्री. गंगाधर गायकवाड, उपाध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती.घुगुस ,श्री.इर्शाद खान,ए.के. व्यापारी, अमोल मांढरे, शहर प्रमुख प्रहार जनशक्ती संघटना, केसरी दैनिक चे उपसंपादक तसेच शोभाताई उमरे तथा अनुप भैय्या भंडारी व समस्त दिव्यांग बंधू भगिनी, घुग्घुस परिसर उपस्थित होते
या कार्यक्रमाची सुरुवात प्रियदर्शीनी कन्या कनिष्ठ महाविद्यालय, घुग्घुस येथील विद्यार्थिनीनी गायलेल्या स्वागत गीताने झाली .त्यानंतर निर्मलाताई शुगरवार यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर घुग्घुस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. निलेश रांजणकर यांनी दिव्यांग बांधवाना मार्गदर्शन केले, त्यांनंतर व्यासपीठावरील इतर मान्यवरांची भाषणे झाली. शेवटी अध्यक्षिय भाषनामध्ये आदरणीय धनंजय साळवे साहेब, समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी दिव्यांग बांधवांच्या समस्या व त्यावर शासन स्तरावरील काही उपाय योजना याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संचालन श्री. शंकर नागपुरे यांनी केले तर आभार प्रा. माधव वनकर सर यांनी मानले. या कार्यक्रमाला घुग्घुस परिसरातील बहुसंख्य दिव्यांग बांधव व भगिनी उपस्थित होत्या.