ऑनलाईन क्रिकेट बेटिंग वर एलसीबी ची धाड

0
7

ऑनलाईन क्रिकेट बेटिंग वर एलसीबी ची धाड

 

घुग्घुस परिसरातील म्हातारदेवी येथे क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या सट्टेबाजावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड मारत 42 लाखांचा मुद्देमाल जप्त केला, आरोपी अंशुल रामबाबू रॉय (26 वर्ष) रा म्हातारदेवी, घुग्घुस विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घुग्गुस परिसरात पेट्रोलिंगवर असतांना म्हातारदेवी परिसरात चिंतामणी कालेज जवळील एक इसम हा आपल्या राहत्या घरी मोबाईल वर ऑनलाईन पद्धतीने सध्या सुरु असलेल्या लिजेंड लीग भारत विरुद्ध वेस्टइंडीज क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा घेतल्या जात असल्याची खबर एलसीबी पथकाला मिळाली.
या खबरेवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अंशुल रामबाबू रॉय याचे घरी छापा टाकून एक अँपल कंपनीचा मोबाईल, अंगझडीत 3 लाख रुपये, 38 लाख रुपयांची ऑनलाईन जुगार आयडी असा एकूण 42 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत आरोपी विरुद्ध घुग्गुस पोलीस स्टेशन येथे जुगार कायद्या अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, सतिश अवयरे, रजनिकांत पुठ्ठवार, दिपक डोंगरे, प्रशांत नागोसे, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, अमोल सावे, मिलीद टेकाम सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here