राजुरा येथे सुधीरभाऊ मुनगंटीवार, देवराव भोंगळे यांचा नागरी सत्कार

0
9

राजुरा येथे सुधीरभाऊ मुनगंटीवार, देवराव भोंगळे यांचा नागरी सत्कार

सचिन भोयर मित्र परिवाराचे आयोजन

 

राजुरा : येथील सुपर मार्केट हॉल येथे (दि. १५) रोज शनिवारला सचिन भोयर मित्रपरिवार यांच्या वतीने विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल सुधीरभाऊ मुनगंटीवार व देवराव भोंगळे यांच्या भव्य संयुक्त नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, देवराव भोंगळे यांच्याबरोबर माझा सुद्धा सत्कार करीत असल्याने मी आपला ऋणी आहे. या कार्यक्रमातून मिळणारी ऊर्जा अधिवेशनात सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्याच्या उपयोगी पडणार असल्याचे व्यक्त केले.

यावेळी मंचावर सत्कारमूर्ती म्हणून सुधीरभाऊ मुनगंटीवार आमदार बल्लारपूर विधानसभा क्षेत्र तथा माजी पालकमंत्री, देवराव भोंगळे आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र, प्रमुख पाहुणे म्हणून विवेक बोढे जिल्हा महामंत्री भाजपा, सुनील उरकुडे राजुरा तालुकाध्यक्ष भाजपा, सुरेशजी रागीट राजुरा शहराध्यक्ष, अर्चना भोंगळे, जिल्हा महिला महामंत्री विजयालक्ष्मी डोहे, महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष माया धोटे, दीपक सातपुते, सोहम बुटले यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी देवराव भोंगळे यांनी सांगितले की, प्रामाणिकपणे माझ्या विजयासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसमवेतच सचिन भोयर मित्रपरिवाराची भुमिका ही पडद्यामागच्या कलाकारांप्रमाणेच आहे. या मित्रपरिवारात सर्वच राजकीय पक्षांचे तरूण सहकारी होते. “परंतू मामा को चुन के लाना हैं” हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपली वैचारिक व पक्षभूमिका बाजुला सारून तन-मन-धनाने माझ्या विजयासाठी कष्ट घेतले. त्यामुळे त्यांचे आभारपर मनोगतातून त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हे मी माझे कर्तव्य समजतो. अशी भावना याठिकाणी बोलताना व्यक्त केली.

या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ता ज्येष्ठ पत्रकार बाबा बेग, मनसेचे माजी उपजिल्हाध्यक्ष सागर भटपल्लीवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष आसिफ सय्यद तसेच शेतकरी संघटनेचे बाजार समिती संचालक प्रफुल्ल कावळे यांचेसह शेकडो नवयुवकांनी भाजपात प्रवेश केला. आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी व देवराव भोंगळे यांनी सर्वांच्या गळ्यात पक्षाचे दुप्पटे टाकून भाजप परीवारात स्वागत केले. या नवप्रवेशितांमध्ये स्वप्नील बाजुजवार, बंडू माणूसमारे, राकेश बेतावार, धोपटाळा ग्रा. पं. सदस्या संगीता हिवराळे, प्रणाली हिवराळे, प्रणय धोटे, राहुल धोटे, रमीज शेख, राजु ददगाड, मुनावर शेख, राहील शेख, सुजेन सय्यद, सिनु मिसलवार, सलमान शेख, साहिल शेख, तुषार येमुलवार, जितु पाल, दिपक मडावी, उमेश दुर्गे, अरबाज शेख, अजय ढूमणे, सिध्दार्थ वाघमारे, दिनेश लसनते, तौफिक शेख, अंकुश वांढरे, जुबेर शेख, वाईस शेख, शाहरुख बेग, ऑस्टीन शेख, राकेश बेत्तावार, शुभम झालवाडे, दिनेश रोगे, कमलाकर डफ, निखिल खोके, दशरथ कौरासे, महेश दोंगडे, संदिप लोहे, महेंद्र बोबडे, अतुल तोडासे, प्रदीप लोहे, अरुण धोंगडे, संदिप हिंगाणे, बाळा बोडेकर, विकास टेकाम, भुषण हिंगाणे, माणिक आत्राम, परशुराम ठावरी, अरुण साळवे, बंडु चौथाले, पंढरी बोबडे, विनोद मुळे, नजीम खान, धनराज आकनुरवार यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण गोरे, आभार स्वप्नील पहाणपट्टे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरीता सचिन भोयर, राजू डाखरे, राजू निमकर, मिथुन थिपे, लुकेश होकाम, निरज मत्ते, महेश झाडे, स्वनिल पाहणपटे, प्रजत नरेंदुलवार, रूपेंद्र ढवस, मारोती आईलवार, अभिजित कोंडावार, चेतन काटोले, शुभम राखुंडे, निखिल पिपरे, आदीत्य धोटे, संदीप भाताने, गणेश धीरज, मयूर झाडे, गोपाल गिरसावळे, प्रशांत माशिरकर, गौरव रामटेके, सुरज खाटीक आदिंनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here