आसिफ सय्यद यांचा भाजप मध्ये प्रवेश

0
7

आसिफ सय्यद यांचा भाजप मध्ये प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाला झटका

 

राजुरा : राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे राजुरा तालुका अध्यक्ष आसिफ सय्यद यांनी पन्नास पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आमदार देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीरभाऊ यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा टाकून पक्ष प्रवेश केला आहे.

राज्याचे माजी मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर व आमदार देवराव भोंगळे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून (दि. १५) रोज शनिवारला सुपर मार्केट हॉल राजुरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देत भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. पक्षाच्या बळकटीसाठी व पक्षाचे विचार घराघरापर्यंत पोहचविण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे मत आसिफ सय्यद यांनी व्यक्त केले.

पक्ष प्रवेश कताना त्यांच्यासोबत स्वप्नील बाजुजवार, प्रणय धोटे, मुर्तजा बैग, रमीज बेग, राजु ददगाड, मुनावर शेख, राहील शेख, सुजेन सय्यद, सलमान शेख, साहिल शेख, तुषार येमुलवार, ज्ञानदीप लाडसे, जितु पाल, दिपक मडावी, उमेश दुर्गे, अरबाज शेख, सिध्दार्थ वाघमारे, तौफिक शेख, जुबेर शेख, वाईस शेख, शाहरुख बेग, ऑस्टीन सावरकर, शुभम झालवाडे, दशरथ कौरासे, महेश दोंगडे, संदिप लोहे, महेंद्र बोबडे, अतुल तोडासे, प्रदीप लोहे, अरुण धोंगडे, संदिप हिंगाणे, बाळा बोडेकर, विकास टेकाम, भुषण हिंगाणे, माणिक आत्राम, परशुराम ठावरी, अरुण साळवे, बंडु चौथाले, पंढरी बोबडे, विनोद मुळे, नजीम खान, धनराज आकनुरवार बिल्लू राठोड, चांद सय्यद, यांच्यासह अन्य राष्ट्रवादीच्या कार्यर्कत्यांनी भाजपा पक्ष प्रवेश केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here