गावातील नागरिकांची करून देण्यात आली पाण्याची व्यवस्था…

0
8

गावातील नागरिकांची करून देण्यात आली पाण्याची व्यवस्था…

घुग्घूस :- स्टील आथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड लिमिटेड चंद्रपूर फेरो आलॉय प्लांट व पहेल मल्टीपर्पज सोसायटी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने व मुख्य व्यवस्थापक श्री.बी विश्वनाथन सर यांच्या मार्गदर्शनातून गावकऱ्यांची पाण्याची अडचण लक्षात घेता . स्मशानभूमी लोहारा व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बोर्डा येथे गावकऱ्यांसाठी बोरवेल ची उपलब्धता करून देण्यात आली. बोरवेल च्या भूमिपूजनाचा सोहळा आयोजित करण्यात आला त्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून श्री. बी विश्वनाथन ( मुख्य व्यवस्थापक) उमेश उके सर ( उपव्यवस्थाक)सौ. वंदना देशपांडे मॅडम ( उपव्यवस्थापक) तर अध्यक्ष स्थानी सौ.किरण चालकुले ( सरपंच लोहारा) व श्री. दिपक खनके ( उपसरपंच बोर्डा) सोबतच ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य सेविका, आशा वर्कर व गावातील नागरिक यांची उपस्थिती होती. उद्घाटक म्हणून बोलत असताना बी विश्वनाथन यांनी गावकऱ्यांच्या विकासासाठी आमची नेहमी तळमळ अशीच कायम राहील. आणि गावातील समस्येच्या तळा गळापर्यंत च्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू असे बोलत होते. या कार्यक्रमाचे संचालन अंजु काकडे यांनी केले तर आभार अर्चना मोहितकर यांनी मानले हा कार्यक्रम उत्तम रित्या पार पाडण्यासाठी पहेल मल्टीपर्पज सोसायटी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here