अल्ट्राटेक सिमेंट कंपनी विरोधात आंदोलन
भारतीय जनता पक्षाचे विविध मागण्या घेऊन आंदोलन
नांदा :- अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने आजुबाजुच्या गावांना दत्तक घेतले असुन त्या गावांच्या समस्या सोडविणे हे कंपनी प्रशासनाचे कर्तव्य आहे. परंतू काही वर्षापासून कंपनी प्रशासन या मुद्याकडे दुर्लक्ष करित आहे. जनतेचे अनेक प्रश्न आणी मागण्या आहेत ज्या कंपनी प्रशासनाला सहज करण्याजोगे असताना सुध्दा कंपनी प्रशासनांनी अजुन पर्यंत त्याची हेतु परस्पर पुर्ता केलेली नाही. त्यामुळे कंपनीचा हेकेखोर धोरणाचा विरोधात राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवरावदादा भोंगळे यांचा निर्देशानुसार भारतीय जनता पार्टी व दत्तक गावातील नागरीक कंपनीचा नांदा प्रवेशद्वारा जवळ दिनांक १६ मार्च रोज रविवारला आंदोलन करण्यात येत आहे.
त्या मागण्या खालील प्रमाणे आहेत.
१. पोलीस स्टेशन ते नथ्थु कॉलोनी पर्यत रोड वरती डस्टची सफाई करुण दररोज सकाळ संध्याकाळ दोन वेळा पाणी मारणे.
२. नांदा ते आजु बाजुच्या परिसरात कंपनीतल्ा डस्ट पासून जी वायु प्रदुषण होत आहे या वरती उपाय योजना करावी
३. नांदा गेट समोरिल झंडया जवळ लोडेड वाहनामुके रांडला चिकणाहट निर्माण झाली, त्यामुळे दुचाकी स्वारांचे गाडी
घसरून अपघात होतात, रोड वरती नव्याने कॉक्रेट टाकणे.
४. उर्वरित लोडर भरती त्वरीत सुरु करुण स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्यात यावे.
५. कंपनीच्या वायु प्रदुषनामुळे परिसरातील शेतक-यांचे (पीकांचे) फार मोठे नुकसान होत असते. त्या करिता शेतक-यांना
नुकसान भरपाई म्हणुन हेक्टरी ५००००/ – रु देण्यात यावे.
६. अल्ट्राटेक कंपनी मधुन ओ्हरलोडेड वाहनाच्या वाहतुकीमुळे रस्त्याची दुरावस्था होत आहे त्यामुळे ओव्हरलोड
वाहनावरती शासन प्रशासन व कंपनी प्रशासनांनी अशी वाहतुक थांबविण्यासाठी त्वरीत कार्यवाही करावी
७. सीएसआर फंडातुन दत्तक गावातील शेतकऱ्याचा शेतात जाणा-या पांदन रस्त्याचे काम प्राधाण्याने करण्यात यावे.
तसेच सीएसआर फंडातील विवीध योजनाचा लाभ दत्तक नावातील लोकांना देण्यात यावा व त्याची माहीती गावातील सर्व चावडीवर लावण्यात यावी.
८. दत्तक गावातील आय टी आय तसेच विवीध पदवीधर युवकांना कंपनीच्या होणा-या नौकर भरतीत प्राधाण्याने संधी देण्यात यावी.
संबंधित मागण्या घेऊन आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनात दत्तक गावातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा तालुका अध्यक्ष संजय मुसळे, शहर अध्यक्ष, संजय नित यांनी केले आहे.