चंद्रपूर ते पुणे व्हाया आदिलाबाद रेल्वेगाडी सूरु करा
काँग्रेसची खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना निवेदनातून मागणी
घुग्घूस :- चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने पुणे येथे शिक्षणासाठी जातात अनेक युवक रोजगारा करीता किंवा रोजगाराच्या शोधात जातात तसेच व्यापार पर्यटन किंवा अन्य कामा निमित्त पुणे येथे जातात मात्र चंद्रपूर येथून आठवड्यात एकच गाडी असल्यामुळे प्रवाश्यांना प्रचंड त्रास होत असतो तसेच महागाडया खाजगी बससेने असुरक्षित प्रवास करावा लागत असतो.
नागरिकांशी संबंधित समस्येचा केंद्रशासनाकडे पाठपुरावा करून आठवड्यातुन दोन दिवस चंद्रपूर पुणे व्हाया आदिलाबाद रेल्वेगाडी शुरु करण्यात यावी अशी मागणी घुग्घूस शहर काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांनी चंद्रपूर वणी आर्णी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना निवेदनातून मागणी केली आहे. निवेदनाची तातळीने दखल घेत धानोरकर यांनी सदर मागणी संसदेत उचलून धरली आहे.
काँग्रेस शिष्टमंडळात काँग्रेस नेते सैय्यद अनवर, तालुका सचिव विशाल मादर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, जिल्हा महासचिव अलीम शेख, मोसीम शेख,सुनील पाटील, नुरुल सिद्दिकी, कुमार रुद्रारप,रोहित डाकुर, दीपक पेंदोर,दीपक कांबळे,अरविंद चहांदे ,अंकुश सपाटे, आयुष आवळे,साहिल आवळे, रंजीत राखुंडे, कपिल गोगला,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.