अवैध रेती साठी खडसंगी ग्रामपंचायत मेहेरबान काय?
चिमूर/आशिष गजभिये : तालुक्यातील खडसंगी ग्रामपंचायत अंतर्गत गावातून मागील अनेक दिवसापासून भरधाव वेगाने अवैध रेती तस्करी करणारे वाहने धावत आहेत. याकडे ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नाही. मानवी वस्तीत जर असा प्रकार होत असेल तर त्या भागातील छोटे मुल फिरत असतात. त्यांना वाहतूक करण्यासाठी केंद्रीय सरकार ने राष्ट्रीय महामार्ग तयार केला आहे. पण छुप्या पद्धतीने ग्रामीण मार्गाचा वापर करण्यात येतोय. आणि भरघाव वेगाचा वापर करण्यात येतो. यात मानवी वस्ती असल्याने छोटे मुल असतात जर अनुचित प्रकार घडलाच तर ग्रामपंचयत प्रशासन जबादारी घेणार काय हा प्रश्न उपस्थित होत आहे.
या प्रकाराकडे ग्रामपंचायत प्रशासनाने गांभीर्याने बघण्याची गरज आहे. कारण संबंधित मार्ग हा मानवी वस्तीतील असून ग्रामपंचायत च्य्या मालकीचा आहे. यामुळे या बिनधास्त होणाऱ्या अवैध रेती वाहतुकीवर आळा घालावा अशी मागणी जनतेतून होत आहे.