‘सोयाबीनने रडवले’ खर्चही नीघाला नाही, नुकसान भरपाई तत्काळ देण्याची मागणी
बोथली (गजानन उमरे) : व्यापार्यांना कोरोनाचा फटका बसला,तर शेतकर्यांना नीसर्गाने फटका दिला.सोयाबीनचे एकरी एक ते दोन क्वींटल उत्पन्न हाती आले.लावलेला खर्च सुद्धा नीघाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.त्यामुळे नुकसान भरपाई तत्काळ देण्याची मागणी शासनाकडे करीत आहे.
जील्ह्यात जे एस 335 या सोयाबीनच्या जातीची अधीक प्रमाणात पेरणी केली जाते.याच जातीवर सर्वाधीक रोगाचा प्रादुर्भाव झाला होता.महागातले महाग औषधांची फवारणी करुन सुद्धा एकरी एक ते दोनच क्वी. उत्पन्न हाती आले.यात मेहनत तर वेगळीच राहली,मात्र लावलेला खर्च सुद्धा नीघाला नाही.
एक एकर सोयाबीनला याप्रमाणे खर्च येतो,बियाणे – 3000 रू.रासायनीक खत डी ए पी – 1250 रु. पेरणी – 600 रु. आंतरमशागत – 1000 रु. तणनाषक -500 रु. कीटकनाशक व टाँनीक – 1000 रु. कापणी व मळणी -2500 रु. हा सर्व खर्च मिळवून 10100 रु ईतका खर्च येतो.
तर दोन क्वी. सोयाबीनचे 3500 प्रमाणे 7000 रु. होतात. खर्च 10100 रु. तर उत्पन्न 7000 रुपयाचे यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकर्यांचे आर्थीक गणीत बिघडले आहे व त्यांना मोठा आर्थीक फटका बसला. शेतकर्यांनी कर्ज काढून शेती केली,मात्र समाधानकारक उत्पन्न न मीळाल्याने कर्ज कसे फेडायचे,रब्बी हंगामातील पीकाचे नीयोजन कसे करायचे,संसाराचा गाडा कसा कसा चालवाचा अशा विवीध समस्याने तो ग्रासला आहे.तरी विमा कंपन्यांनी तत्काळ विमा रक्कम द्यावी व शासनाने सुद्धा तत्काळ नुकसान भरपाई खात्यावर जमा करावी,अशी मागणी शेतकरी करीत आहे.
यावर्षी 25 एकरात जे एस 335 या सोयाबीनच्या जातीची पेरणी केली,मला याकरीता 2,55,600 रु. खर्च आला,व यातून मला 50 क्वी. उत्पन्न मिळाले,त्याची बाजार भावानुसार कींमत 82,500 रु. आहे.यात माझी मेहनत तर वेगळीच राहली,मात्र माझा लावलेला खर्च नीघाला नाही.मागील वर्षी मला 200 क्वी. उत्पन्न मीळाले होते.मी पोस्ट मास्तर आहे,मी यातून सावरेल मात्र जे अल्पभुधारक शेतकरी आहे व सोयाबीन पीकावरच अवलंबून आहे,ते कसे जगेल हा मोठा प्रश्न आहे,तरी शासनाने आर्थीक मदत करावी.