त्या प्राध्यापकावर संस्था चालक कारवाई करणार काय?
आशिष गजभिये
चिमूर
तालुक्यातील एका गावात नामंकित शिक्षण संस्थेत एका कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्राध्यापकाने एका माजी विद्यार्थिनीला भ्रणध्वनीवरून संदेश पाठवल्याची घटना उघडकीस आली.या संदेशात माझी पत्नी प्रयाराजला गेली आहे,तू घरी ये तुला हजार रुपये देतो.अशी गळ घालण्यात आली होती. याबाबतची माहिती मुलीच्या वडील व भावाला होताच सदर स्त्रीलंपट प्राध्यापकाचे घर गाठून त्याला जाब विचारत त्याला चांगलाच चोप देण्यात आला.
अलीकडेच तो प्राध्यापक कार्यरत असलेल्या शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष यांनी शिक्षक कसा असावा? याचे मूर्तिमंत उदाहरण समाज माध्यमावर प्रकाशित केलं. त्या वर अनेकांनी अभिप्राय पण दिला.आता शिक्षक कसा असावं त्याच उदाहरण तर अध्यक्ष महोदयांनी दिलं.पण तुमच्याच शिक्षण संस्थेत कार्यरत असलेला प्राध्यापक अनेक वर्षापासून विविध विद्यार्थीनीची छेड काढून अश्लील मागण्या करीत असेल.त्या प्राध्यापकांवर आपण कारवाई करणार काय?
सामाजिक संघटना होणार सहभागी
या प्रकरणात संबंधित शिक्षण संस्थेने जर थातूरमातूर कारवाई करून प्रकरणं दळपण्याच्या प्रकार केला तर यात सामजिक संघटना सहभागी होणार आणि आक्रमकतेने हे प्रकरण समोर आणनार असल्याची माहिती आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून कळाली आहे.