बुद्धगया बोधिमहाविहार मुक्त करा..!
वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेचे बिहार मुख्यमंत्री व राष्ट्रपतींना निवेदन
पोंभूर्णा :-११ मार्च :- पोंभुर्णा तालुका वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा तालुका पोंभुर्णा तर्फे बुद्ध गया बोधिमहाविहार ब्राम्हणांपासून मुक्त करण्यासाठी तहसीलदारा मार्फत काल सोमवारी (१० मार्च) बिहार मुख्यमंत्री व महामहिम राष्ट्रतींना निवेदन देण्यात आले.
बुद्धगया बोधिमहाविहार ब्राह्मणांपासून मुक्त व्हावे, जसे हिंदूंचे मंदिर हिंदूंकडे आहेत तसेच बौद्धांचे विहार बौद्धाना सोपाविण्यात यावे, बुद्ध गया मंदिर अधिनियम १९४९ रद्द करण्यात यावे, व तेथील ज्या बौधमहाविहारावर ब्राम्हणांचे अतिक्रमण आहे ते काढावे. ब्राम्हणां पासून बोधिमहाविहार मुक्त करावे व ते महाविहार बौद्धांना सोपविण्यात यावे यासाठी तहसील कार्यालय पोंभुर्णा येथील तहसीलदारामार्फत बिहार चे मुख्यमंत्री मा. नितीश कुमार, मा. राष्ट्रपती, प्रधानमंत्री तसेच आदरणीय भिमराव यशवंत आंबेडकर यांच्याकडे निवेदन पाठवावे अशी विनंती करण्यात आली.
सदर निवेदन देण्यासाठी पोंभुर्णा तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अविनाश वाळके,महासचिव रवी तेलसे,नगरसेवक तथा युवक अध्यक्ष अतुल वाकडे,शहराध्यक्ष राजू खोब्रागडे,नगरसेविका रिनाताई उराडे, संघटक विजय दुर्गे, अजूभाऊ उराडे, पराग उराडे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष संदीप निमसरकार, उपाध्यक्ष, श्यामकुमार गेडाम, सरचिटणीस संस्कार प्रकाशजी तावाडे, समता सैनिक दलाचे महेंद्रजी उराडे, उपाध्यक्ष हर्षानंद दुर्गे, प्रियंका हर्षानंद दुर्गे, संघटक सचिव मंगलदास लाकडे, दूषिलाताई उराडे, विजयाताई भसारकर तालुका उपाध्यक्ष, इंदिरा उराडे , प्रभाताई खोब्रागडे सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.