यशवंत गायकवाड यांचा कव्वाली तथा सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम…
महाबोधी महाविहार बुद्धगया टूर फॅमिली कविटपेठ तर्फे भोजनदान
विरुर स्टे./राजुरा, ९ फेब्रु. :- महाबोधी महाविहार बुद्धगया टूर फॅमिली कविटपेठ तर्फे जागतिक महिला दीन औचीत्याने सामाजिक भोजनदान कार्यक्रम काल ८ तारखेला सायंकाळी ७ वाजता बुद्ध विहार येथे आयोजित करण्यात आला होता. गावातील २३ उपासकांनी १० दिवसीय टूर काढून बौद्ध स्थळी भेट दिली. यात लुंबिणी (नेपाळ), सारनाथ, कुशिनगर, महाबोधी महविहार बुद्धगया, सांची या स्थळांना भेटी दिल्या. या प्रवासा निमित्ताने सामाजिक भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात होता. सदर कार्यक्रम यशश्वीततेसाठी सर्वांनी मोलाचे सहकार्य केले.
भोजनदान कार्यक्रमा नंतर यशवंत गायकवाड यांचा कु. शिवानी मारोती देठे हिच्या १० व्या जन्म दीन निमित्त सामाजिक प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सूरवात करण्यात आली. मंचावर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या नंतर शिवानी हिचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. भिमगीत व बुद्धगीत तसेच सामजिक प्रबोधनपर कार्यक्रम अतिशय सुरेल स्वरात पार पडला. सदर प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजक व संयोजक मारोती देठे तथा महाबोधी महाविहार बुद्धगया टूर फॅमिली ने अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रीती तेलसे तर आभार रामदास दुर्योधन यांनी मानले.