सीसीआयची बंद कापूस खरेदी केंद्र पूर्ववत सुरू!
शेतकऱ्यांनी कापुस विक्रीला नेण्याचे आमदार देवराव भोंगळे यांचे आवाहन
मुंबई, दि. ०६ मार्च
चंद्रपुर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) चे कापुस खरेदी केंद्रे मुदतीआधीच बंद करण्यात आल्याने कापुस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले होते. आमदार श्री. देवराव भोंगळे यांनी आज सकाळी मुंबई विधान भवनात पणन मंत्री ना. जयकुमारजी रावल तसेच सीसीआय व कापुस फेडरेशनच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सीसीआयकडून बंद करण्यात आलेली कापुस खरेदी केंद्रे पुर्ववत सुरू करून शेतकऱ्यांचा कापुस खरेदी करावा अशी मागणी केली तत्क्षणीच मंत्री ना. जयकुमारजी रावल आणि सीसीआयचे सीएमडी श्री. गुप्ता यांनी सीसीआयचे एजीएम (अकोला) श्री. निरज कुमार यांना तातडीने बंद असलेली सर्व कापुस खरेदी केंद्रे पुर्ववत सुरू करण्याचे निर्देश दिले.
महाराष्ट्रातील ३०% कापूस हा विदर्भात उत्पादित होत असून राजुरा विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पाद होते. परंतू सीसीआयचे एजीएम श्री. निरजकुमार यांच्या मनमानी कारभारामुळे राजुरा विधानसभा मतदारसंघातील सर्व कापुस खरेदी केंद्रे बंद करण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विक्रीविणा शेतकऱ्यांच्या घरीच कापुस पडून होता. या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष घालून आमदार श्री. देवराव भोंगळे यांनी सीसीआयचे एजीएम श्री. निरजकुमार यांना विचारणा केली असता त्यांनी चुकीची माहिती पुरवली. यासंदर्भात सीसीआयच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना भेटून आमदार श्री. देवराव भोंगळे यांनी पणन मंत्री ना. जयकुमारजी रावल यांना संपूर्ण गैरप्रकार लक्षात आणून दिला. प्रसंगी मंत्री ना. जयकुमारजी रावल आणि सीसीआयचे सीएमडी श्री. गुप्ता यांनी सीसीआयचे एजीएम (अकोला) निरज कुमार यांना तातडीने बंद असलेली सर्व कापुस खरेदी केंद्रे पुर्ववत सुरू करण्याचे निर्देश दिले.
आमदार देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्यामुळे आता सीसीआयचे कापुस खरेदी केंद्रे पुर्ववत सुरू होणार असून शेतकऱ्यांनी आजपासूनच आपला कापुस सीसीआयच्या खरेदी केंद्रावर विक्रीसाठी न्यावा असे आवाहन आमदार श्री. देवराव भोंगळे यांनी केले आहे.