विद्यार्थिनीला पाठविला अश्लील मॅसेज ; कुटूबियानी दिला शिक्षकाला चोप
चिमूर तालुक्यातील शिक्षकाचा प्रताप, वरोरा शहरातील घटना
आशिष गजभिये
चिमूर :– तालुक्यातील नामवंत शिक्षण संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालय विभागात कार्यरत वरोरा शहरात वास्तव्यास असणाऱ्या शिक्षकाने ‘ माझी पत्नी प्रयागराजला गेली आहे,तू घरी ये,तुला एक हजार रुपये देतो ‘ असा संदेश विद्यार्थिनीला केला. हा संदेश विद्यार्थिनीने कुतुबियाना दाखविला त्या नंतर वडील,भाऊ व नातलगांनी थेट शिक्षकांचे घर गाठून चांगलाच चोप दिल्याची घटना उघडकीस आली.बदनामी होणार,या भीतीने कुटूबियाणी पोलिसात तक्रार देण्याचे टाळले.मात्र या घटनेमुळे वरोरा शहरात एकच खळबळ उडाली पण या शिक्षकांचे कार्यक्षेत्र चिमूर तालुक्यात असल्याने तालुक्यात ही या प्रकरणाची चांगलीच चर्चा एकवयास मिळत आहे.
याच शिक्षकाने या आधीही अशाच अनेक विद्यार्थिनीच्या छेड काढल्या आल्याची बाब सामोरे येत आहे.एका प्रकरणात तर त्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर त्याला संस्थेने निलंबित केले होते. हे विशेष!
शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते पवित्र मानले जाते मागील काही वर्षामध्ये या नात्याला काही शिक्षकाकडून काळीमा फासन्याचां प्रयत्न केला जात आहे.असाच प्रकार चिमूर तालुक्यात कार्यरत असणाऱ्या शिक्षकाकडून घडला.आपल्याच विद्यार्थिनीला मोबाईल वर संदेश केला.हा संदेश येताच तिने आपल्या कुटंबियाना दाखविला.शिक्षकाकडून असा संदेश येणे अपेक्षित नसल्याने वडिलांसह कुटूबियाचा पारा चढला आणि त्यांनी शिक्षक राहत असलेल्या वरोरा शहरातील ले – आऊट मध्ये जाऊन शिक्षकांचे घर दाटले.त्यानंतर या बाबत जाब विचारण्यात आला.
एवढेच नाही तर शिक्षकाला चांगला चोपही देण्यात आला. ले – आऊट मधील रहिवाशी हा प्रकार बघत होते.तर काहीना याची कल्पना सुद्धा आली. चक्क तर ही वार्ता शिक्षक कार्यरत असणाऱ्या तालुक्यात येवून पोहचली.विशेष म्हणजे असे की या शिक्षकाने या पूर्वीही असे अनेक प्रकार केले असून एका प्रकरणाची तक्रार झाल्याची माहिती सूत्रानी दिली त्या प्रकरणात शिक्षकाला संस्थेने निलंबित केले होते.तरीही या शिक्षकाने न सुधारता आपल्या विद्यार्थिनीला मॅसेज करून घरी बोलाविले. त्या मुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय.
कठोर कारवाई केली असती तर…
या पूर्वीही अश्या अनेक घटना घडल्याचे बोलले जात आहे. एका प्रकरणात तर चक्क पोलीस तक्रार झाली असल्याचे कळते तेव्हाच या शिक्षकावर शिक्षण संस्थेने कठोर कारवाई केली असती तर अदाचीत असा प्रकार घडला नसता असे सामान्य नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र शिक्षण संस्थेने तात्पुरते निलंबन करून कठोर कारवाई करणे टाळल्याने हा प्रकार घडला असे सर्वत्र नागरिक चर्चा करीत आहेत.