महाशिवरात्रीनिमित्त माणिकगड शंकर देव मंदिर यात्रेकरूंना प्रसाद वाटप
गडचांदूर – महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर माणिकगड पर्वतावरील शंकर देव मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे भव्य यात्रा भरली. या यात्रेसाठी हजारो भाविक भक्तांनी शंकराच्या दर्शनासाठी गर्दी केली. यात्रेकरूंच्या सेवा भावनेतून गडचांदूर येथील आंबेडकर चौकात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सुनील झाडे व महादेव हेपट यांच्या वतीने येणाऱ्या भाविकांना सुमारे दीड क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.
या प्रसाद वाटप कार्यक्रमात हंसराज चौधरी, नोगराज मंगरूळकर, रऊफ खान वजीरखान, विठ्ठल थिपे, अशोक बावणे, सचिन भोयर, आशिष देरकर, शैलेश लोखंडे, संतोष महाडोळे, अक्षय गोरे, पवन राजूरकर, रोहित शिंगाडे, संजय रणदिवे, राकेश शेंद्रे, गणेश सातपाडे, प्रवीण देवलवार, प्रणित अहिरकर, प्रणय पानघाटे, श्रीनिवास पवार, सागर मसे, मुक्तार अली, अमन निजामी, गुणवंत खोके, विशाल राव, हिमांशू गोरे, सुहास बोढे, राजीव बिस्वास, सुयोग भोयर, अतुल बोबडे, दशरथ जुमनाके, ऋषी चटप, शुभम बावणे, संकेत लांडे, हरि कुरेकर, दत्तू पानघाटे, मयूर येडमे आदी उपस्थित होते.
महाशिवरात्री निमित्ताने भाविक भक्तांसाठी आयोजित या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात असून, यात्रेकरूंसाठी हे सेवाकार्य प्रेरणादायी ठरले आहे.