बेलोरा येथे आमदार देवराव भोंगळे यांचा सत्कार…

0
26

बेलोरा येथे आमदार देवराव भोंगळे यांचा सत्कार…

कोरपना प्रतिनिधी

दिनांक 28/02/2024 का मौजा बेलोरा येथे आमदार देवराव भोंगळे यांचे जाहीर सत्कार करण्यात येणार असून भोंगळे परिवारातील ज्येष्ठ मंडळी यांचे पुढील पिढीला आपली ओळख व्हावी. उद्देशाने स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. नोकरी व व्यवसायानिमित्त भोंगळे परिवारातील बरेच आप्तगन हे दूर दूर पर्यंत गेलेले आहे. त्यांच्या भेटी गाठी होत नाही. माणसाजवळ मोबाईल इंटरनेट सुविधा सोशल मीडिया येऊन पोहोचलेला आहे तरीपण आप्तगण्याची भेट होत नाही . सर्व आपल्या गणगोत व नातेवाईकाची एकमेकांना ओळख व भेटी गाठी होईल या उद्देशाने या स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन केलेले आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून भोंगळे परिवार बेलोरा तालुका वनी जिल्हा यवतमाळ येथे वास्तव्यास आहे. भोंगळे परिवाराचे उगमस्थान बेलोरा हे गाव आहे अशी बोलले तरी वावगे नाही. फक्त जातीचे दाखले किंवा जात वैधता प्रमाणपत्र करिता काढत असताना पुराव्यासाठीच आपले गाव असे बेलोरा आहे असे व्हायला नको. आज बेलोरा गावाच्या चारी बाजूने डब्लू सी एल झालेली आहे त्यामुळे काही जणांना शेतीनिमित्त तर काही परिवारातील लोकांना नोकरी व धंदे निमित्त गाव सोडून जाण्याची वेळ आलेली आ हे.भोंगळे परिवारातील काही सदस्य आज घुगूस, चंद्रपूर ,वनी कोरपना तसेच गडचांदूर राजुरा, वडगाव, व माननीय आमदार देवराव दादा यांचे मूळचे गाव बेलोरा हेच आहे. या स्नेह मिलन सोहळ्याच्या उद्देशाने सर्व भोंगळे परिवारात मोठ्या व लहान मंडळींची भेटी गाठी होतील हे एक विशेष राहील. आज आपण नोकरी व व्यवसाय निमित्त बाहेरगावला जरी गेलो असले तरी आपलेच होते हाच एक आदर्श ठेवून भोंगळे परिवाराच्या स्नेह मिलन सोहळ्याचे व माननीय देवराव दादा आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केलेल आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी माननीय रमेशराव भोंगळे सरपंच ग्रामपंचायत मारेगाव कोरंबी राहणार आहे. तरी सदरील कार्यक्रमास जास्तीत जास्त भोंगळे परिवारातील सदस्यांनी उपस्थित राहावे असे आव्हान सत्कार व आयोजक समिती आणि श्री प्रदीप भोंगळे यांनी केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here