धक्कादायक – पुण्यातील स्वारगेट शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार
या घटनेचा सम्राट अशोक सेनेकडू पुणे इथे जाहीर निषेध : राज्य सरकार होश मे आओ…
पुणे :- पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकात पहाटे पाच वाजताच्या सुमारास शिवनेरी बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
बसस्थानकात बलात्कार झालेली घटना अतिशय गंभीर आहे. राज्यातल्या लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महिलांवर बलात्काराच्या घटना या तिघाडी सरकारच्या कारकिर्दीत घडल्या लाडक्या बहिणीला 1500 रुपये खात्यात टाकून,गुलाबी जॅकेट घालून लाडकी बहीण म्हणत मिरवल्याने महिलांची सुरक्षा होणार नाही. त्या महिलांना सुरक्षा देण्याचा काम केलं पाहिजे. राज्यातील बसस्थानक,रेल्वे स्टेशन,विमानतळ तरी सुरक्षित ठेवा इथे तरी महिलांना लचके तोडण्याचा काम करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी या रहतेतल्या महिलांच्या केसाला सुद्धा हात लागू दिला नाही त्याच रयतेच्या राज्यात आज महिलांची सुरक्षा किती आहे.? नुसती शिवशाही नाव देऊन उघड्या डोळ्याने शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याच्या बातम्या पाहत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलांचे हातपाय कापून जसा चौरंग केला होता,तसेच या नराधमांचे केलं पाहिजे .त्याला फाशी द्या नाहीतर भर चौकात त्या नराधमाच्या छातीत बंदुकीच्या गोळ्या घालून एन्काऊंटर करा कारण महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे अशी मागणी सम्राट अशोक सेनेचे आकाश दादा शिरसाट यांनी केली आहे.