महाबुध्दविहार बुद्ध गया आंदोलन उद्देशाने टिटवाळ्यात बहुजन सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक
ठाणे :- टिटवाळ्यात बैठकीला कल्याण, शहाड, आंबिवली, डोंबिवली, टिटवाळा, वासिंद, मुरबाड, शहापूर आणि नवी मुंबई येथील 27 कार्यकर्ते उपस्थित होते. काल 23 फेब्रुवारी रोजी या बैठकीत आंदोलन कसे पुर्णत्वास जाईल किंवा त्यासाठी काय काय करता येईल या विषयी विचार विनिमय करण्यात आला.
यावेळी समता सैनिक दलाचे महाराष्ट्र संघटक मार्शल अनिकेत उबाळे (टिटवाळा), मार्शल सुरेश जाधव, टिटवाळा मार्शल रविंद्र पवार वासिंद, BSP चे राजेश पवार मुरबाड, राजेश कांबळे कल्याण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.