कोरपना येथील ईरई या गावी युवा स्वाभिमान पार्टी चे जिल्हा अध्यक्ष श्री सुरज ठाकरे यांच्या नेतृत्वात शाखेचे गठण.
आज दिनांक 03/11/2020 रोजी युवा स्वाभिमान चे जिल्हा अध्यक्ष युवा नेता सुरज ठाकरे यांच्या उपस्थितीत ईरई गावातील महिला पुरुष व युवा वर्गाने मोठ्या संख्येने आमदार श्री रवी राणा व खासदार सौ नवनीत राणा यांच्या विचारांना व कामाला प्रेरित होऊन युवा स्वाभिमान पार्टी मध्ये प्रवेश केला .
युवा स्वाभिमान पार्टी ची चंद्रपूर जिल्ह्यातील धुरा सुरज ठाकरे या युवा नेत्याला मिळाल्याने. या पक्षाला जिल्ह्यामध्ये चांगले दिवस आले असून सुरज ठाकरे यांच्या लोकप्रियतेचा व एक मार दोन तुकडे अशा पद्धतीच्या कार्यशैली मुळे मोठ्या प्रमाणात गावो गावी पक्षामध्ये सामील होणाऱ्या लोकांचा ओघ वाढताच आहे , भविष्यात नक्कीच चंद्रपूर जिल्हा हा युवा स्वाभिमान पार्टी चा बाले किल्ला होणार यात काही शंका नाही असे सुरज ठाकरे यांनी या वेळी सांगितले.
या वेळी कोरपना तालुका अध्यक्ष मोहब्बत खान, नितेश बेरड, समीर देवगडे, निखिल पिदुरकर, राहुल चव्हाण, अजवान टाक ,निखिल बजा इत , व नदीम शेख, कूकू सोनई व गावकरी मंडळी उपस्थित होते