विरुरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी
विविध स्पर्धेत महिलांनी घेतला सहभाग
विरुर (स्टेशन) / अविनाश रामटेके
श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ यांनी विरुरात मोठया उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुंदर सजावट करून महाराजांच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजा अर्चना करण्यात आली यावेळी विरूर येथिल सरपंच अनिल आलाम, सौ. प्रितिताई पवार तसेच अविनाश रामटेके अध्यक्ष तंटामुक्त समिती विरुर स्टेशन यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन करून प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ विरूर स्टेशन चे अध्यक्ष तुषार मोरे यांनी ध्वजारोहण करून महाराजांना मानवंदना देत शिवगर्जना करीत उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधले. यावेळी गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.
शिवजयंती चे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ व विरूर वाकिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महाराजांची पालखी काढुन विद्यार्थी करिता व महीला साठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये चित्रकला स्पर्धा यावेळी 1 ते 10 वी पर्यंतच्या 86 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तीन गटात असलेल्या चित्रकला स्पर्धेत एकूण 9 विद्यार्थ्यांना पारितोषिक व नगदी स्वरूपात रक्कम भेट देण्यात आली. तसेच रॅली दरम्यान संस्कृतीक डान्स स्पर्धा, लेझीम नृत्य स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने विरूर येथील विद्यार्थी सह मोठया संख्येत महिलांनी सहभाग घेतला. आणि आपल्या कलागुणांची सुंदर अशी प्रस्तुती करून उपस्थिताचे मने जिकले. सर्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून बापूभाऊ धोटे राजुरा व सौ. धारनेवर मॅडम राजुरा यांनी काम केले. रॅलीचे समापन नंतर भव्य पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी सर्व विजेता स्पर्धकांना शिल्ड व नगदी रक्कम देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मंचावर गावातील प्रमुख नागरिकासह सर्व समाजाचे अध्यक्ष यांच्या हस्ते सदर बक्षीस वितरण करण्यात आला. व आयोजकांनी केलेल्या महाप्रसाद चा समस्त गावकऱ्यांनी आस्वाद घेतला.
कार्यक्रम चे संचालन प्रवीण चिडे तर प्रस्ताविक प्रदीप पाला व आभार प्रदर्शन अविनाश रामटेके यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करिता तुषार मोरे, अजय रेड्डी, संगेश पावडे, विशाल जिवतोडे, प्रदीप देठे, स्वप्नील भोसकर, योगेश बक्षी, सचिन फ़टाले, सॊ सरिता रेड्डी, प्रियंका रामटेके, आशा चांदेकर, नीलिमा पावडे, सुषमा पावडे,अनुराधा चिडे, सुनंदा मोरे, रुपाली ताकसंडे यांनी अथक परिश्रम घेतले.