लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशन तर्फे वढा गावातील नागरिकांना मिळेल शुद्ध पेयजल
लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशन यांच्या विद्यमानाने सामाजिक दायित्व विभागांतर्गत आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, सामाजिक जनजागृती यासारखे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे , याच माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना गावात पिण्यायोग्य पाणी मिळावे यासाठी दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी शुक्रवारला वढा या ग्रामीण भागात जलशुद्धीकरण केंद्राची सुरुवात करण्यात आली . या उदघाटणीय सोहळ्यास उदघाटक म्हणून लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड चे युनिट हेड श्री. वाय. जी. एस. प्रसाद व वरिष्ठ उपाध्यक्ष श्री प्रशांत पुरी , प्रमुख पाहुणे म्हणून गावाचे सरपंच , लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशन चे उप व्यवस्थापक दिपक साळवे व ग्राम पंचायत सदस्य तसेच गावातील रहिवासी उपस्थित होते. वढा हे धार्मिक दृष्ट्या नावाजलेले गाव असल्यामुळे तिथे वर्षभर भाविकांची वर्दळ असते. जलशुद्धीकरण केंद्र स्थापन करण्याचा उद्देश्य हा गावातील जनतेला तसेच मंदिरातील भाविकांना व पर्यटकांना शुद्ध पेयजल मिळावा जेणेकरून डायरिया सारख्या दूषित पाण्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांना प्रतिबंध व्हावा हा आहे अशे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री प्रशांत पुरी नागरिकांशी बोलते वेळी म्हणाले. उदघाटनांनंतर पाणी भरण्याकरिता २११ कुटुंबियांना स्मार्ट कार्ड वितरित करण्यात आले ज्याचा फायदा ८४० गावकऱ्यांना होईल.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशन च्या संपूर्ण चमू ने अथक परिश्रम घेतले व कार्यक्रम पार पाडला.