चंद्रपूर शहरात गोंडवाना साम्राज्याचे शौर्य प्रतीक राणी हिराई यांचा पुतळा निर्माण करावा
काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना निवेदनातून मागणी
चंद्रपूर :- जिल्हा व शहर हा गोंडवाना साम्राज्याची ऐतहासिक भूमी असून चंद्रपूरचे गोंडराजे बिरशाह यांच्या पत्नी राणी हिराई यांचा इतिहास हा शौर्य पराक्रम त्याग व बलिदानाने परिपूर्ण असून आज जगभरातील पर्यटक आग्रा येथे प्रेमाची निशाणी ताजमहाल पाहण्यासाठी येत असतात अशीच प्रेमाची निशाणी बिरशाह यांच्या स्मुर्तीस सदैव जिवंत ठेवण्यासाठी भव्य स्मारक चंद्रपूर येथे निर्माण केला आहे.
राजाच्या मृत्यू नंतर 1704 पासून 15 वर्ष गोंडवाना राज्याचे शासन चालवत असतांना त्यांनी मुघल सल्तनत, मराठा साम्राज्य, बहमरी सुलतान यांच्या सोबत जवळपास 16 युद्धे लढली व ही सर्व युद्ध जिंकली.
महाराणी हिराई आत्राम यांच्या कालखंडात त्यांनी आपल्या राज्याच्या विकासात बहुमोल कामगिरी केली.
हिराई यांचा गौरवशाली इतिहास काळाच्या पडदा दडला असून हा सुवर्ण इतिहास येणाऱ्या पिढीला प्रेरणादायक ठरावा याकरिता चंद्रपूर बस स्थानक परिसरात किंवा जटपुरा गेट येथे आतील भागात राणी हिराई यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्यात यावा व याठिकाणी सुंदर असा स्मारक निर्माण करावा अशी मागणी काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदनातून केली आहे.
याप्रसंगी शिष्टमंडळात काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, आदिवासी समाजाचे युवा नेते दिपक पेंदोर, बालकिशन कुळसंगे, तालुका सचिव विशाल मादर, मोसीम शेख, रोहित डाकूर, नुरूल सिद्दीकी, सुनील पाटील, कुमार रुद्रारप, अभिषेक सपडी, दिपक कांबळे, कपिल गोगला, अरविंद चहांदे, अंकुश सपाटे, आयुश आवळे, साहिल आवळे व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.