पृथ्वी स्थलावर धर्म स्थापनेसाठी भगवंत अवतार धारण करतात – साध्वी आनंदी दिदी

0
21

पृथ्वी स्थलावर धर्म स्थापनेसाठी भगवंत अवतार धारण करतात – साध्वी आनंदी दिदी

श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान येथील हनुमान चालीसा कार्यक्रम

 

तालुका प्रतिनिधी
चिमूर

येथील श्रीहरी बालाजी मंदिरात दर मंगळवारला हनुमान चालीसा पठण करण्यात येते. बालाजी महाराजांच्या पावन धरती मध्ये सद्या महाराजांचा घोडा यात्रा महोत्सव सुरू आहे. याच मंगळवारी वृदांवन येथील भागवत कथाकार आनंदी दिदी यांनी उपस्थित राहून भक्तजनाना मार्गदर्शन केलं.
त्यांनी मंगळवारी होणाऱ्या हनुमान चालीसा पठण कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना माहिती दिली की, मानव जात ही अनेक रोगांनी ग्रस्त आहे,त्यात दुःख,जन्म,मृत्यू,हे ठरलच आहे. पण यात आपले कार्य, वासना, लालसा, अहंकार यात मानव जात आंधळी झाली आहे. या सर्व गोष्टी साठीच भगवंत आपल्यात मानव रुपी अवतार घेतात. जेव्हा – जेव्हा मानव जातीची या पृथ्वी स्थळावर हानी होत आहे तेव्हा भगवंत अवतार घेऊन धर्म स्थापन करून आपल्याला मुक्त करतोय. असे प्रतिपादन साध्वी आनंदी दिदी यांनी (भक्तीप्रिया) यांनी केले.
या हनुमान चालीसा प्रसंगी भाजप युवा नेते तथा संजय गांधी निराधार समिती चे चिमूर तालुका अध्यक्ष संजय नवघडे व भारतीय जनता पार्टी विद्यार्थी मोर्चा चे विधानसभा संयोजक पंकज मालोदे यांचे कडून महाप्रसाद वितरीत करण्यात आला.
या प्रसंगी हनुमान चालीसा प्रसारक मंडळ खडसंगी यांनी हरिकृष कामडी व हमुमान चालीसा प्रसारक डा. दीपक दडमल यांचे मार्गदर्शनात हनुमान चालीसा पठण करण्यात आले. यात शेकडो भक्त मंडळी सहभांगी होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here