जिल्हा परिषद चंद्रपूर शिक्षण विभाग व लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशनतर्फे कार्यशाळा
लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशन, जिल्हा परिषद चंद्रपूर आणि पंचायत समिती चंद्रपूर च्या संयुक्त विद्यमाने जि.डी.गोयंका लॉयड्स पब्लिक स्कूल म्हातारदेवी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेत शिक्षकांना अध्यापनाच्या नवनवीन पद्धती, विद्यार्थ्यांमधील अध्ययन क्षमता विकास आणि शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेचे उद्घाटन मा.श्री प्रशांत पुरी वरिष्ठ उपाध्यक्ष लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री निवास कांबळे गट शिक्षण अधिकारी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. शुभांगी पिदुरकर विस्तार शिक्षण अधिकारी जि प चंद्रपूर,मा. जेसी रॉय, प्राचार्य जी.डी.गोयंका लॉयड्स पब्लिक स्कूल म्हातारदेवी, मा. श्री. सोनपाल फिटिंग शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती चंद्रपूर, श्री अनिल दागमवार, केंद्रप्रमुख घुग्गुस, उपव्यवस्थापक श्री दीपक साळवे व एकूण पंधरा शाळेतील मुख्याद्यापक उपस्थित होते.
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड चे वरिष्ठ उपाध्यक्ष मा. श्री प्रशांत पुरी यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना,”आजच्या युगात शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशनने शिक्षकांसाठी आयोजित केलेली ही कार्यशाळा नक्कीच उपयुक्त ठरेल,” असे विचार व्यक्त केले. तसेच फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली आणि शिक्षकांना अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
कार्यशाळेत गट शिक्षण अधिकारी मा. श्री निवास कांबळे यांनी शिक्षकांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यामध्ये विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढवणे, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणे आणि त्यांना आधुनिक शिक्षण पद्धतीची ओळख करून देणे यासारख्या विषयांचा समावेश होता. तसेच जि. डी. गोयंका लॉयड्स पब्लिक स्कुल म्हातारदेवी येथे अधिकारी व शिक्षकांनी पाहणी केली व शाळेची शिक्षण, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी कोणती प्रणाली वापरली जाते याची माहिती जाणून घेतली व शाळेची संपूर्ण अधिकारी व शिक्षकांनी कौतुक केले
कार्यशाळेत सहभागी झालेल्या शिक्षकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. “या कार्यशाळेमुळे आम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि विद्यार्थ्यांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याची प्रेरणा मिळाली,” असे शिक्षकांनी सांगितले. लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशन भविष्यातही शिक्षकांसाठी अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करणार असल्याचे संस्थेने सांगितले.
तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशन च्या संपूर्ण टीम ने अथक परिश्रम घेतले व कार्यक्रम पार पाडला.